ऑकलंड - सुरुवातीपासून आजपर्यंत कसोटी क्रिकेटने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. पूर्वीच्या काळी निश्चित कालमर्यादा नसलेल्या कसोटी सामन्यांना पुढे पाच दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. मात्र आता कसोटी क्रिकेटच्या वेळेत अजून एक मोठा बदल होणार असून, आता चार दिवसांचे कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. आयसीसीने प्रायोगित तत्त्वावर चार दिवसांचे कसोटी सामने खेळवण्यास मंजुरी दिली असून, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्बे यांच्यात 26 डिसेंबरपासून सुरू होणारा कसोटी सामना चार दिवसांचा खेळवण्यात येणार आहे. ऑकलंड येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या बैठकीत 2019 च्या विश्वचषकापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर चार दिवसांचे कसोटी सामने खेळवण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे आयसीसीचे सदस्य देश चार दिवसांचे कसोटी सामने खेळू शकतील. याबाबत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डस् म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय क्रिकेटला विशेषकरून कसोटी क्रिकेटला नवीन संदर्भ आणि नाविन्य मिळेल, अशी चौकट तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कसोटी क्रिकेटच्या भवितव्याबाबत चर्चा करताना आम्हाला नवीन पर्याय आणि प्रयोग करावे लागतील, असा विचार समोर आला. चार दिवसांचे कसोटी सामने हे त्या दिशेन टाकलेले एक पाऊल आहे. पहिला चार दिवसीय कसोटी सामना दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळवण्यात येईल. हा कसोटी दिवस-रात्र पद्धतीने खेळवण्यात येईल." दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार फाफ डू प्लेसिस याने मात्र आयसीसीच्या या निर्णयावर टीका केली आहे. तसेच अटीतटीचे कसोटी सामने शेवटच्या दिवशी शेवटच्या तासापर्यंत रंगतात असा टोलाही त्याने लगावला आहे. दरम्यान, क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीने आयसीसीने अजून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आज झालेल्या बैठकीत टेस्ट चॅम्पियनशिप आणि वन डे इंटरनॅशनल लीगला आयसीसीने हिरवा झेंडा दाखवला आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी आयसीसी नियामक मंडळाच्या बैठकीनंतर बोलताना ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून यासंबंधी चर्चा सुरु होता. आज झालेल्या बैठकीनंतर अखेर आयसीसीने यासंबंधी निर्णय घेऊन टाकला. आयसीसीच्या या नव्या निर्णयानंतर वन डे प्रमाणे कसोटीतही चॅम्पियनशिप खेळली जाणार आहे. कसोटी चॅम्पियनशिपसाठी एकूण नऊ संघ सहभागी असतील. क्रमवारीतील पहिले नऊ संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पात्र असतील. प्रत्येक संघ एकूण सहा कसोटी मालिका खेळतील. सहा मालिकांपैकी तीन मालिका घरच्या मैदानावर, तर उर्वरित सहा मालिका प्रतिस्पर्धी देशात होतील. 2019 वर्ल्ड कपनंतर कसोटी क्रिकेटमधील या नव्या पर्वाला सुरुवात होईल. प्रत्येक संघाला किमान दोन कसोटी सामने खेळणं आवश्यक असून मालिकेत या सामन्यांची संख्या पाचपर्यंत वाढवता येऊ शकते. झिम्बाम्ब्वे, अफगाणिस्तान आणि आयर्लंडला मात्र कसोटी चॅम्पियनशिपमधून वगळण्यात आले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आता कसोटी सामने होणार चार दिवसांचे, या दोन संघांमधील कसोटीने होणार सुरुवात
आता कसोटी सामने होणार चार दिवसांचे, या दोन संघांमधील कसोटीने होणार सुरुवात
पूर्वीच्या काळी निश्चित कालमर्यादा नसलेल्या कसोटी सामन्यांना पुढे पाच दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. मात्र आता कसोटी क्रिकेटच्या वेळेत अजून एक मोठा बदल होणार असून, आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 6:02 PM
ठळक मुद्देकसोटी क्रिकेटच्या वेळेत अजून एक मोठा बदल होणार असून, आता चार दिवसांचे कसोटी सामने खेळवण्यात येणार आयसीसीने प्रायोगित तत्त्वावर चार दिवसांचे कसोटी सामने खेळवण्यास मंजुरी दिलीदक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्बे यांच्यात 26 डिसेंबरपासून सुरू होणारा कसोटी सामना चार दिवसांचा खेळवण्यात येणार आयसीसीचे सदस्य देश चार दिवसांचे कसोटी सामने खेळू शकतील