नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची परस्पर हितसंबंधांच्या प्रकरणात न्यायमूर्ती डी.के. जैन यांच्या समोर १४ मे रोजी साक्ष होणार आहे. या प्रकरणात वैयक्तिकरित्या सुनावणीसाठी बीसीसीआयचे लोकपाल सहनैतिक अधिकारी न्यायमूर्ती डी.के. जैन यांच्यासमोर हे खेळाडू उपस्थित राहतील.तक्रारकर्ते मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे संजीव गुप्ता आणि बीसीसीआयचे राहुल जोहरी यांनादेखील न्यायमूर्ती डी.के. जैन यांनी साक्षीसाठी बोलावले आहे.गुप्ता यांनी तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्यावर दुहेरी लाभ घेतल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या दोन्ही खेळाडूंनी त्याचा इन्कार केला आहे. हे दोन्ही खेळाडू क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सचिन लक्ष्मणची होणार साक्ष
सचिन लक्ष्मणची होणार साक्ष
नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची परस्पर हितसंबंधांच्या प्रकरणात न्यायमूर्ती डी.के. जैन यांच्या समोर ...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 4:41 AM