GOAT Movie, CSK connection: थलपती विजय (Thalapathy Vijay) याचा द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम (GOAT) हा वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक सिनेमा होता. यात विजयने डबल रोल साकारला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने दमदार ओपनिंग केली. पण हळूहळू कमाईत घट जाणवू लागली आहे. भारतात आतापर्यंत या सिनेमाने ४४ कोटी रुपये कमावले आहेत. त्यात तमिळ भाषेतील सिनेमाची कमाई ३९.१५ कोटी रुपये इतकी आहे. यादरम्यान, दिग्दर्शकाने सिनेमा फ्लॉप होण्याच्या कारणाचा IPL संघ चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) कनेक्शन असल्याचे सांगितले आहे.
GOAT बॉक्स ऑफिसवर फ्लॉप का?
GOAT तामिळनाडूमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तिथे विजयचा मोठा चाहतावर्ग आहे. इतर राज्यांमध्ये चित्रपटाला खूप संघर्ष करावा लागत आहे. दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी चित्रपट चांगला न चालण्याचे आणि फ्लॉपच्या दिशेने जाण्याचे कारण सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार याचे मुख्य कारण इंडियन प्रीमियर लीगचा संघ चेन्नई सुपर किंग्ज असू शकतो.
GOAT चा क्लायमॅक्स चेपॉक स्टेडियमवर झालाय. पण तो शेवट चेन्नई सुपर किंग्जच्या विरोधात आहे. बॉम्बचा स्फोट रोखण्यासाठी विजय प्रयत्न करत असतो असा तो सीन आहे. आम्हाला प्रत्येकाला तो सीन चांगला वाटला होता. पण कदाचित काहींना CSK च्या विरोधातील गोष्ट आवडली नसावी. या पैलूमुळे चित्रपटाचे तामिळनाडू बाहेरील आकर्षण मर्यादित राहिले, असे ते म्हणाले.
GOAT फ्लॉप होण्याबद्दल व्यंकटचा खुलासा?
“चेन्नई सुपर किंग्जला फ्रेममध्ये घेतल्याबद्दल मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचे चाहते मला ट्रोल करतात,” असे तो मस्करीच्या स्वरात म्हणाला. “आम्ही सर्व सीएसकेचे चाहते आहोत, ते आमच्या रक्तात आहे आणि आम्ही ते नाकारू शकत नाही. कदाचित, सीएसके कनेक्शनमुळेच हा चित्रपट तेलुगू आणि हिंदी प्रेक्षकांना फारसा अपील झाला नसावा. आमच्याइतका आनंद त्यांना घेता आला नसावा," असे मजेशीर उत्तर त्याने दिले.
Web Title: Thalapathy Vijay starrer GOAT flop in Telugu Hindi due to Chennai Super Kings connection says Venkat Prabhu MI RCB fans troll me
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.