ठाणे :- ठाण्यातील दादोजी कोंडदेवक्रीडाप्रेक्षागृह येथे क्रिकेटपटूंसाठी आंतरराष्ट्रीयदर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे.अनेक वर्षानी या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाविरुध्द ठाणे हा सराव सामना रंगला. हा सरावसामना पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांनी मोठीगर्दी केली होती. 16 वर्षाखालील गटातझालेला क्रिकेटचा सामना क्रिकेटप्रेमींसाठीपर्वणी ठरली. या सराव सामन्यात ठाणे सेंटरसंघ 3 गडी राखून विजयी झाला. मुंबई क्रिकेटअसोसिएशनच्या माध्यमातून एकदिवसीयक्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलीअसल्याची माहिती क्रीडा अधिकारी मीनलपालांडे यांनी दिली. दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृहातीलखेळपट्टी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची तयारकरण्यात आली आहे. या खेळपट्टीवरखेळण्याचा सराव व्हावा यासाठी याएकदिवसीय क्रिकेट सराव सामन्याचेआयोजन करण्यात आले होते. ठाण्यातीलठाणे सेंटर संघ विरुध्द ऑस्ट्रेलिया असा 35षटकांचा सराव सामना आज दिनांक 15एप्रिल, 2019 रोजी रंगला. हा सराव सामनापाहण्यासाठी ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी गर्दी केलीहोती. दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथेतयार करण्यात आलेली धावपट्टी ही उत्तमदर्जाची असून याची माहिती ऑस्ट्रेलिया येथेदेणार असल्याचे ऑस्ट्रेलिया 16 वर्षाखालीलसंघाचे प्रशिक्षक ब्रूस वूड (BruceWood) यांनी नमूद केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दादोजी कोंडदेव मैदानात रंगला ठाणे विरुध्द ऑस्ट्रेलिया असा क्रिकेट सामना
दादोजी कोंडदेव मैदानात रंगला ठाणे विरुध्द ऑस्ट्रेलिया असा क्रिकेट सामना
ठाणे सेंटर संघ 3 गडी राखून विजयी झाला.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 8:47 PM