Dinesh Karthik ला चाहूल लागली, निवृत्तीची घोषणा केली? इस्टाग्रामवरील पोस्टची जोरदार चर्चा

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik Retirment?) याने दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 01:26 PM2022-11-24T13:26:09+5:302022-11-24T13:26:37+5:30

whatsapp join usJoin us
'Thank You to All My Fellow Players...': Indian wicketkeeper-batter Dinesh Karthik Shares Mysterious Instagram Post | Dinesh Karthik ला चाहूल लागली, निवृत्तीची घोषणा केली? इस्टाग्रामवरील पोस्टची जोरदार चर्चा

Dinesh Karthik ला चाहूल लागली, निवृत्तीची घोषणा केली? इस्टाग्रामवरील पोस्टची जोरदार चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik Retirment?) याने दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागन केले. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपनंतर कार्तिक संघाबाहेर होता, त्याने भारताच्या काही सामन्यांमध्ये समालोचकाची भूमिका बजावली. पण, आयपीएलमध्ये त्याने अविश्वसनीय खेळी करून पुन्हा टीम इंडियात जागा पटकावली. त्यामुळेच ३७ वर्षीय कार्तिकला ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. २००७ च्या वर्ल्ड कपमध्ये खेळणारे दोनच भारतीय ( रोहित व दिनेश) २०२२च्या वर्ल्ड कपमध्ये खेळले. पण, भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून दारूण पराभव पत्करावा लागला. आता BCCI ने २०२४च्या वर्ल्ड कपची तयारी सुरू केली आहे आणि त्यासाठी कर्णधारबदलापासून खेळाडूंना डच्चू देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

सुरेश रैना शून्यावर आऊट; निकोलस पूरनने कुटल्या १३ चेंडूंत ६८ धावा, किरॉन पोलार्डच्या ४५ धावा


तामिळनाडूच्या दिनेश कार्तिकलाही आता यापुढे संध मिळणे अवघड असल्याची कुणकुण लागली असावी आणि त्यामुळेच त्याने इंस्टाग्रावर भावनिक पोस्ट लिहीली. या पोस्टनंतर कार्तिकच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. “भारतासाठी वर्ल्ड कप जिंकणे आणि त्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे खूप अभिमानास्पद गोष्ट होती… आम्हाला ऑस्ट्रेलियात ध्येय गाठता आले नाही, परंतु या प्रवासाने माझ्या आयुष्यात नव्या आठवणींचा साठा जमा झाला आहे. माझ्या सर्व सहकारी खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, मित्रांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांचे अखंड समर्थनासाठी धन्यवाद. #DreamsDoComeTrue #T20WorldCup,” असे कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.  


कार्तिकने या पोस्टसह एक व्हिडीओ अपलोड केला आहे आणि त्यात त्याने ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. संघ व्यवस्थापकांनी रिषभ पंतच्या जागी कार्तिकलाच प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणे योग्य समजले. पाकिस्तानविरुद्धची लढत वगळता कार्तिकला फार काही चांगली कामगिरी कता आली नाही. कार्तिकने भारताकडून ६० ट्वेंटी-२० सामने खेळले आणि त्यात ६८६ धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये ९४ सामन्यांत त्याने १७५२ धावा केल्या आहेत.  कसोटीत त्याने २६ सामन्यांत १०२५ धावा केल्या आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 'Thank You to All My Fellow Players...': Indian wicketkeeper-batter Dinesh Karthik Shares Mysterious Instagram Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.