थरंगा दोन सामन्यांसाठी निलंबित, उर्वरित सामन्यांसाठी श्रीलंका संघ जाहीर

श्रीलंकेचा कर्णधार उपुल थरंगाला भारताविरुद्ध पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुस-या वन-डे लढतीत संथ षटकगतीसाठी दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:34 AM2017-08-26T00:34:22+5:302017-08-26T00:34:37+5:30

whatsapp join usJoin us
Tharanga suspended for two matches, the Sri Lanka squad for the remaining matches | थरंगा दोन सामन्यांसाठी निलंबित, उर्वरित सामन्यांसाठी श्रीलंका संघ जाहीर

थरंगा दोन सामन्यांसाठी निलंबित, उर्वरित सामन्यांसाठी श्रीलंका संघ जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पल्लीकल : श्रीलंकेचा कर्णधार उपुल थरंगाला भारताविरुद्ध पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुस-या वन-डे लढतीत संथ षटकगतीसाठी दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला केवळ ४७ षटके खेळायचे होते, पण श्रीलंकेने निर्धारित वेळेत तीन षटके कमी टाकली. भारताने २.४ षटके शिल्लक राखत तीन गडी राखून विजय मिळवला. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
यंदाच्या मोसमात श्रीलंकेला दुस-यांदा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. यापूर्वी तत्कालीन कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत संघाचे नेतृत्व करीत असताना संथ षटकगतीसाठी त्याच्यावर दोन सामन्यांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
श्रीलंकेने संघात दोन बदल केले आहे. कसोटी कर्णधार दिनेश चंदीमल व फलंदाज लाहिरू थिरिमाने यांना संघात स्थान देण्यात आले आहे. थिरिमानेचा कसोटी संघातही समावेश होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. सलामीवीर धनुष्का गुणतिलका दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. गुणतिलका यानंतर किमान दोन सामने खेळू शकणार नाही.
तिसºया व चौथ्या वन-डे सामन्यात चंदीमल संघाचे नेतृत्व करणार नाही, हे विशेष. त्याऐवजी चमारा कपुगेदरा संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. पहिल्या दोन लढतींसाठी त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे तो कर्णधारपदाचा हकदार होता. थरंगा सध्या चांगल्या फॉर्मात नाही. त्याने तीन कसोटी सामन्यांत सहा डावांमध्ये केवळ ८८ धावा केल्या तर पहिल्या दोन वन-डे सामन्यांत ९ व १३ धावा फटकावल्या. थिरिमानेने अखेरचा वन-डे सामना जानेवारी २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत १०७ वन-डे सामने खेळले आहेत. चंदीमलला १२८ वन-डे सामने खेळण्याचा अनुभव आहे. (वृत्तसंस्था)

श्रीलंका संघ :-चमारा कपुगेदरा (कर्णधार), दिनेश चंदीमल, लाहिरू थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसाल मेंडिस, मिलिंदा श्रीवर्धना, मालिंदा पुष्पकुमार, अकिला धनंजय, लक्षण संदाकन, तिसारा परेरा, वानिंदू हसरंगा, लेसिथ मलिंगा, दुशमंत चमीरा, विश्व फर्नांडो, उपुल थरंगा (पाचव्या सामन्यासाठी).

Web Title: Tharanga suspended for two matches, the Sri Lanka squad for the remaining matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.