Join us  

फक्त एकदाच मला अश्रू अनावर झाले, २०११च्या विजयानंतरही नव्हतो रडलो; गौतम गंभीरने सांगितला तो किस्सा 

भारतीय संघाने १९८३ व २०११ साली वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे आणि यंदा मायदेशात होणारी स्पर्धा जिंकून तिसरा वर्ल्ड कप नावावर करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 3:01 PM

Open in App

भारतीय संघाने १९८३ व २०११ साली वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे आणि यंदा मायदेशात होणारी स्पर्धा जिंकून तिसरा वर्ल्ड कप नावावर करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हा वर्ल्ड कप खेळणार आहे.  महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०११मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीवीर म्हणून गौतम गंभीरने मोठा वाटा उचलला होता. त्याने फायनलमध्ये महत्त्वपूर्ण ९७ धावा केल्या होत्या. २००४ ते २०१६ अशी १२ वर्ष गौतम गंभीरने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ९०च्या दशकातील भारतीय संघाच्या आठवणींना उजाळा देताना गौमत गंभीरने आयुष्यातील सर्वात वेदनादायी अनुभव सांगितला.

रिषभ पंतवर यशस्वी शस्त्रक्रिया, पण...! वर्ल्ड कप खेळण्याबाबत डॉक्टरांनी दिले अपडेट्स 

१९९२ चा वर्ल्ड कप हा भारतासाठी इतिहासातील सर्वात वाईट वर्ल्ड कप स्पर्धेपैकी एक होता. भारतीय संघ सातव्या स्थानावर राहिला आणि राऊंड रॉबिन टप्प्यात बाहेर पडला. भारतीय संघाने ८ पैकी फक्त दोनच सामने जिंकले होते. भारताला अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून १ रनने पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे युवा गौतम गंभीरला खूप रडू आलं होतं. 

भारताच्या या माजी सलामीवीराने खुलासा केला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या पराभवानंतर मी ढसाढसा रडलो होते. मला आठवतं की ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप सुरू होता तेव्हा भारताचा कांगारूंकडून एका धावेने पराभव झाला होता. तेव्हाच मी रडलो होते आणि त्यानंतर मी  रडलो नाही. मला आठवते की मी क्रिकेटमुळे फक्त एकदाच रडलो होतो. भारत हा सामना अवघ्या एका धावेने हरला म्हणून मी कदाचित रडलो असेन. त्यानंतर मी कधी रडलो नाही. २०११ च्या वर्ल्ड कप विजयानंतर माझ्या डोळ्यांतून एकही अश्रू आला नाही.   

१९९२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २३७ धावा केल्या होत्या. डीन जोन्सने १०८ चेंडूत ९० धावांची खेळी केली होती. भारताकडून मनोज प्रभाकर आणि कपिल देव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पावसामुळे हा सामना ४७  षटकांचा झाला आणि भारतासमोर २३६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. मोहम्मद अझरुद्दीन यांच्या ९३ धावांच्या केलीनंतरही भारताला हार मानावी लागली. टॉम मुडीने तीन विकेट्स घेतल्या. वेंकटपथी राजू अखेरच्या चेंडूवर रन आऊट झाला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :गौतम गंभीरआयसीसीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App