IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. बुधवारी त्यांनी घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर २९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ते गुणतालिकेत १०व्या क्रमांकावर आठव्या स्थानावर सरकले. मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचा हा पहिला विजय होता, तर त्याच्या माजी कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात २७ चेंडूंत ४९ धावा करून विजयाचा पाया रचला. रोहित अर्धशतक हुकला असला तरी त्याची खेळी महत्त्वपूर्ण होती आणि त्यासाठी प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये विशेष पुरस्कार दिला. पुरस्कार मिळाल्यानंतर, रोहितने भाषण देखील केले. ज्यात त्याने संघाने एक युनिट म्हणून सामन्यात केलेल्या खेळावर प्रकाश टाकला.
रोहित शर्मासोबत भांडण? हार्दिक पांड्याचं मोठं विधान; मॅचनंतर म्हणाला, ड्रेसिंग रुममध्ये...
मार्क बाऊचर : रो, आम्ही तुम्हाला हा पुरस्कार देणार आहोत कारण तुम्ही फलंदाजीतील दमदार कामगिरी केली आहे.
आश्चर्यचकित झालेल्या रोहित शर्माला किरॉन पोलार्डने मानाचा बॅच दिला आणि रोहित गालातल्या गालात हसत होता.
रोहित शर्मा म्हणाला, "फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून दाखवली. ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी आपण सर्वजण पहिल्या सामन्यापासून प्रयत्नशील आहोत. फलंदाजांच्या संपूर्ण युनिटने चागंली कामगिरी केली आणि यासाठी त्यांचे कौतुक. वैयक्तिक कामगिरीने काही फरक पडत नाही. जर आपण संघाचे ध्येय पाहिले तर आपण अशा प्रकारचा खेळ करून ध्येय साध्य करू शकतो. फलंदाजी प्रशिक्षक (पोलार्ड), मार्क (बाऊचर) आणि कर्णधार (हार्दिक) यांना हेच हवे आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे पाहून खूप आनंद झाला."
“प्रत्येकाचा विश्वास होता की आम्हाला फक्त एक विजय हवा आहे. आजची सुरुवात अप्रतिम होती. ६ षटकांत ७० धावा करणे, नेहमीच आश्चर्यकारक होते. संधी मिळाल्यावर प्रत्येकाने ज्या प्रकारे कामगिरी केली, हे पाहणे चांगले होते. रोमारियोची हिटिंग दमदार होती. त्याने आम्हाला सामना जिंकून दिला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते,” असे हार्दिक म्हणाला.