Join us  

श्रीलंकेतील आंदोलन चिघळले, आंदोलकांची कसोटी सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये धडक

Sri Lanka Crisis Updates: श्रीलंकेतील परिस्थिती अधिकच बिघडली असून, त्याचे लोण श्रीलंकेतील इतर शहरांपर्यंत पसरले आहे. गॉल शहरात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. तिथेही आंदोलक पोहोचले आहेत. आज सामन्यादरम्यान, स्टेडियमजवळ शेकडो आंदोलक दिसून आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 3:25 PM

Open in App

गॉल - आर्थिक संकट आणि राजकीय अस्थैर्यामुळे श्रीलंकेमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनापर्यंत धडक दिली आहे. आज परिस्थिती अधिकच बिघडली असून, त्याचे लोण श्रीलंकेतील इतर शहरांपर्यंत पसरले आहे. गॉल शहरात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. तिथेही आंदोलक पोहोचले आहेत. आज सामन्यादरम्यान, स्टेडियमजवळ शेकडो आंदोलक दिसून आले.

आज सकाळपासून हजारो आंदोलक गॉल येथे पोहोचले असून, त्यांनी स्टेडियमच्या बाहेर आणि स्टेडियममध्ये आपला आवाज बुलंद केला. मात्र या आंदोलनाचा सामन्यावर काही परिणाम झाला नाही. आंदोलन सुरू असताना कसोटी सामना नियोजितपणे सुरू राहिला.

गॉल येथील मैदानाजवळ एक किल्ला आहे. सामना सुरू असताना तिथे चढण्यास मनाई असते. मात्र आंदोलकांनी तिथे धाव घेतली आणि तिथूनन आंदोलकाने फलक फडकवले. तसेच स्टेडियमबाहेरही हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी उपस्थित राहत जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान श्रीलंकेतील विविध शहरांत आंदोलकांचा जमाव हजारोंच्या संख्येने रस्त्यांवर उतरत आहे. तसेच त्यामध्ये काही प्रतिष्ठित व्यक्तीही दिसून येत आहेत. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या हासुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनासमोर झालेल्या आंदोलनातही सनथ जयसूर्या सहभागी झाला होता. 

टॅग्स :श्रीलंकाराजकारणआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App