आशिया कप फायनल कॅन्डीला हलविणार..., पावसाने वैतागलेल्या एसीसीचा मोठा निर्णय?

Asia Cup 2023 final: स्पर्धेतील सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या सामन्याचाच विचका झाल्यानंतर आता आशियाई क्रिकेट काैन्सिल कोलंबो येथील आशिया कपचा अंतिम सामना कॅन्डीच्या पल्लीकल मैदानावर हलविण्याच्या हालचाली करीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 06:14 AM2023-09-12T06:14:29+5:302023-09-12T06:14:52+5:30

whatsapp join usJoin us
The Asia Cup final will be moved to Kandy..., the big decision of the rain-frustrated ACC? | आशिया कप फायनल कॅन्डीला हलविणार..., पावसाने वैतागलेल्या एसीसीचा मोठा निर्णय?

आशिया कप फायनल कॅन्डीला हलविणार..., पावसाने वैतागलेल्या एसीसीचा मोठा निर्णय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो - आशिया कप २०२३मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. स्पर्धेतील सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या सामन्याचाच विचका झाल्यानंतर आता आशियाई क्रिकेट काैन्सिल कोलंबो येथील आशिया कपचा अंतिम सामना कॅन्डीच्या पल्लीकल मैदानावर हलविण्याच्या हालचाली करीत आहे.

आशिया कपची फायनल १७ सप्टेंबरला कोलंबो येथे खेळविण्यात येणार होती. मात्र, कोलंबो येथील हवामान बेभरवशाचे  झाले आहे. त्यामुळे एसीसी कोलंबो येथील फायनल पल्लीकल येथे हलविण्याच्या तयारीत आहे. पल्लीकल स्टेडियम हे कॅन्डी येथे आहे. या मैदानावर स्पर्धेचे तीन साखळी सामने झाले आहेत.  

पहिला सामना हा श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात झाला. हा सामना पावसाच्या व्यत्ययाविना पार पडला. मात्र, भारत -पाकिस्तान सामन्यात पावसाने खेळ केला अन् सामन्याचा निकाल लागला नव्हता. नेपाळ- भारत सामन्यातदेखील पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारत विजयी झाला होता.
 

Web Title: The Asia Cup final will be moved to Kandy..., the big decision of the rain-frustrated ACC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.