कोलंबो - आशिया कप २०२३मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. स्पर्धेतील सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या सामन्याचाच विचका झाल्यानंतर आता आशियाई क्रिकेट काैन्सिल कोलंबो येथील आशिया कपचा अंतिम सामना कॅन्डीच्या पल्लीकल मैदानावर हलविण्याच्या हालचाली करीत आहे.
आशिया कपची फायनल १७ सप्टेंबरला कोलंबो येथे खेळविण्यात येणार होती. मात्र, कोलंबो येथील हवामान बेभरवशाचे झाले आहे. त्यामुळे एसीसी कोलंबो येथील फायनल पल्लीकल येथे हलविण्याच्या तयारीत आहे. पल्लीकल स्टेडियम हे कॅन्डी येथे आहे. या मैदानावर स्पर्धेचे तीन साखळी सामने झाले आहेत.
पहिला सामना हा श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात झाला. हा सामना पावसाच्या व्यत्ययाविना पार पडला. मात्र, भारत -पाकिस्तान सामन्यात पावसाने खेळ केला अन् सामन्याचा निकाल लागला नव्हता. नेपाळ- भारत सामन्यातदेखील पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारत विजयी झाला होता.