Asia Cup will be held in UAE : देशातील आर्थिक परिस्थितीमुळे श्रीलंकेने आशिया चषक २०२२च्या आयोजन करण्यास नकार दिल्यानंतर आता ही स्पर्धा यूएईत होणार असल्याचे BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने जाहीर केले. ''आशिया चषक स्पर्धा यूएईत होणार आहे. सध्या तरी तो एकच देश आहे की तेथे पावसाचा व्यत्यय येणार नाही,''असे BCCIच्या बैठकीनंतर गांगुलीने PTI ला सांगितले.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, देशातील सध्याची राजकीय आणि आर्थिक स्थिती पाहिली तर आशिया चषकाचे आयोजन करण्याची देशात स्थिती नाही. खासकरून परकीय चलनाचा विचार केला, तर ६ देशांच्या संघाची ही मोठी स्पर्धा आयोजित करणे त्यांच्यासाठी सोयीचे नाही. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याआधी श्रीलंका प्रीमिअर लीग स्थगित केल्याचे जाहीर केले होते. आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.
१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आमि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: The Asia Cup, which was scheduled to be held in Sri Lanka, has been shifted to the UAE, BCCI president Sourav Ganguly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.