सुलक्षण नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षपदासाठी निवडलेल्या अर्जदारांची मुलाखत घेतली. विचारपूर्वक विचारविनिमय केल्यानंतर या त्रिसदस्यीय समितीने एकमताने अमोल मुझुमदार यांची या जबाबदारीसाठी निवड केली. BCCI ने अमोल मुझुमदार हे टीम इंडियाचे नवीन मुख्य प्रशिक्षक (वरिष्ठ महिला) असतील असे जाहीर केले.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुझुमदारने २१ वर्षांच्या प्रभावी कारकिर्दीत १७१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३० शतकांसह ११,०००धावा केल्या. त्याने १००हून अधिक लिस्ट ए सामने आणि १४ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. त्याने मुंबईसह अनेक रणजी विजेतेपद जिंकले आहेत आणि आसाम व आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “मी भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अमोल मुझुमदार यांच्या नियुक्तीचे स्वागत करतो. मला विश्वास आहे की त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघ खेळाच्या विविध फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करत राहील. संघाने द्विपक्षीय आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे आणि मला खात्री आहे की आमच्या खेळाडूंना मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होईल.”
या नियुक्तीनंतर अमोल मुझुमदार म्हणाला, “भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याबद्दल मला खूप सन्मान आणि विशेषाधिकार मिळाला आहे. माझ्या दूरदृष्टीवर व टीम इंडियासाठीच्या रोडमॅपवर विश्वास ठेवल्याबद्दल मी क्रिकेट सल्लागार समिती आणि बीसीसीआयचे आभार मानतो. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि मी प्रतिभावान खेळाडूंसोबत जवळून काम करण्यास आणि त्यांना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी योग्य तयारी आणि मार्गदर्शन प्रदान करण्यास उत्सुक आहे. या कालावधीत दोन विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने पुढील दोन वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत.”
Web Title: The BCCI confirms the appointment of Amol Muzumdar as the new Head Coach of Team India (Senior Women)
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.