BCCI ने आणखी एक विकेट काढली! राहुल द्रविडने निवडलेल्या खास माणसाच्या करारात केली नाही वाढ

BCCI on CLEAN UP mission - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर BCCI ने क्लिन अप मोहीम हाती घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 09:15 AM2022-11-26T09:15:27+5:302022-11-26T09:16:18+5:30

whatsapp join usJoin us
The BCCI will not be renewing India's mental conditioning coach Paddy Upton's contract. | BCCI ने आणखी एक विकेट काढली! राहुल द्रविडने निवडलेल्या खास माणसाच्या करारात केली नाही वाढ

BCCI ने आणखी एक विकेट काढली! राहुल द्रविडने निवडलेल्या खास माणसाच्या करारात केली नाही वाढ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BCCI on CLEAN UP mission - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर BCCI ने क्लिन अप मोहीम हाती घेतली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हकालपट्टी केल्यानतर BCCI ने कर्णधार रोहित शर्माकडे मोर्चा वळवला.  २०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी बीसीसीआय आतापासून कामाला लागली आहे आणि त्यांनी संघातील सीनियर सदस्यांना ट्वेंटी-२० विसरा असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याकडे बीसीसीआय ट्वेंटी-२० संघाचा भविष्याचा कर्णधार म्हणून पाहत आहे. त्यात राहुल द्रविड याच्याकडूनही ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद जाण्याचे संकेत मिळत आहेत आणि त्याची सुरुवात द्रविडने नियुक्त केलेल्या व्यक्तिच्या करारात वाढ न करून झाली आहे.

भारतीय संघाचे मानसिक आरोग्य प्रशिक्षक पॅडी अप्टन ( Paddy Upton) यांच्या करारात BCCI वाढ करणार नसल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. राहुल द्रविड याने अप्टन यांची निवड केली होती अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्यांचा करार रद्द होणार झाला, परंतु बीसीसीआयने तो पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी अप्टन यांची निवड झाली आणि वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत करार झाला. राहुल द्रविडने अप्टन यांचे नाव सुचवले होते. खेळाडूंच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचं काम अप्टन यांच्यावर होता आणि त्यांनी वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान विराट कोहली, लोकेश राहुल यांच्यासोबत सत्र घेतले होते. 

२०११च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे कोच गॅरी कर्स्टन यांच्या टीममध्येही अप्टन यांचा समावेश होता. आयपीएलमध्येही त्यांनी राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स व पुणे वॉरियर्स यांच्यासोबत काम केले आहे. 

'आम्ही ट्वेंटी-२० संघासाठी नवा कर्णधार निवडतोय'; रोहित शर्माने काय उत्तर दिलं, पाहा!
 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आता आम्हाला कोणताच धोका पत्करायचा नाही. ट्वेंटी-२० संघासाठी नव्या कर्णधार निवडण्याबाबत आम्ही रोहित शर्माशी चर्चा केली आहे आणि त्याची काहीच हरकत नाही. अशीच चर्चा राहुलसोबत करणार आहोत. त्यांच्यावरील वर्क लोड कमी करणे, हा त्यामागचा हेतू आहे. ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-२० विश्वचषकामध्ये आलेल्या अपयशानंतर टीम इंडियात बरेच बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: The BCCI will not be renewing India's mental conditioning coach Paddy Upton's contract.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.