Join us

टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह

Salil Ankola Mother Death: भारताचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सलील अंकोला यांच्या आईचं नाव माला अंकोला असं होतं. त्या ७७ वर्षांच्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 20:08 IST

Open in App

भारताचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सलील अंकोला यांच्या आईचं नाव माला अंकोला असं होतं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या घरात त्या एकट्याच राहत होत्या. दरम्यान, आज सकाळी कामवाली बाई घरी आली असता, त्या मृतावस्थेत आढळल्या. 

माला अंकोला मृतावस्थेत सापडल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार असून, त्यानंतरच सलील अंकोला यांच्या आईचा मृत्यू नेमका कसा झाला हे समोर येणार आहे. दरम्यान, सलील अंकोला यांनी इन्स्टाग्रामवर गुड बाय मॉम अशी पोस्ट टाकत आईच्या मृत्यूची माहिती दिली आहे.

सलील अंकोला हे नव्वदच्या दशकात भारतीय क्रिकेट संघामधून खेळले होते. त्यांनी १ कसोटी आणि २० एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच पुढच्या काळात त्यांनी अभिनय क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं होतं.  

टॅग्स :पुणेभारतीय क्रिकेट संघपरिवार