‘डेथ ओव्हर’मधील गोलंदाजीवर तोडगा काढावाच लागणार, आज वेस्ट इंडीजविरुद्ध लढत

टी-२० विश्वचषक : भारताची आज वेस्ट इंडीजविरुद्ध लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 05:56 AM2023-02-15T05:56:31+5:302023-02-15T05:57:35+5:30

whatsapp join usJoin us
The bowling in the 'death over' has to be resolved, today against the West Indies | ‘डेथ ओव्हर’मधील गोलंदाजीवर तोडगा काढावाच लागणार, आज वेस्ट इंडीजविरुद्ध लढत

‘डेथ ओव्हर’मधील गोलंदाजीवर तोडगा काढावाच लागणार, आज वेस्ट इंडीजविरुद्ध लढत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

केपटाउन : पाकिस्तानला नमवून विजयी मोहीम सुरू करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघापुढे टी-२० विश्वचषकात बुधवारी वेस्ट इंडिजचे आव्हान असेल. या सामन्यात अखेरच्या टप्प्यातील (डेथ ओव्हर) गोलंदाजी सुधारण्यावर भर द्यावा लागेल.
बोटाला दुखापत झालेली उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या अनुपस्थितीत भारताने पाकविरुद्ध सर्वांत मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. विंडीजविरुद्ध स्मृतीचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. विंडिजने इंग्लंडला पहिला सामना मोठ्या फरकाने गमावला होता. पाकविरुद्ध भारताच्या गोलंदाजांनी अखेरच्या दहा षटकांत ९१ धावा मोजल्या होत्या. ही पुनरावृत्ती वारंवार होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.

भारताने नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत विंडिजवर दोनदा विजय साजरा केला. त्यामुळे त्यांच्या फलंदाजीची भारतीय गोलंदाजांना पुरेशी कल्पना आहेच. दुसरीकडे पाकविरुद्ध भारताच्या फलंदाजीतही काही उणिवा जाणवल्या. युवा यष्टिरक्षक ऋचा घोष हिने १८ व्या षटकात तीन चौकार ठोकून संकटातून बाहेर काढले होते. त्याआधी शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया आणि हरमनप्रीत कौर यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. विंडिजविरुद्ध जेमिमा रॉड्रिग्ज हिच्याकडून अपेक्षा आहेत.  हेले मॅथ्यूजच्या नेतृत्वात विंडिज संघाने लागोपाठ १४ सामने गमावले आहेत. त्यामुळे हा सामना गमावल्यास विंडिज संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीबाहेर पडेल.

 

Web Title: The bowling in the 'death over' has to be resolved, today against the West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.