टीम इंडियाच्या या विस्फोटक सालमीवीराची कारकीर्द संपुष्टात? निवड समितीने दाखवला बाहेरचा रस्ता

Mayank Agarwal: भारतीय कसोटी संघातून खेळण्याचं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. मात्र अगदीच मोजक्या खेळाडूंची संघात निवड होते आणि त्यातील काहींनाच प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळते. इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 07:31 PM2022-06-06T19:31:10+5:302022-06-06T19:31:46+5:30

whatsapp join usJoin us
The career of this explosive opener Mayank Agarwal has come to an end? The selection committee showed the way out | टीम इंडियाच्या या विस्फोटक सालमीवीराची कारकीर्द संपुष्टात? निवड समितीने दाखवला बाहेरचा रस्ता

टीम इंडियाच्या या विस्फोटक सालमीवीराची कारकीर्द संपुष्टात? निवड समितीने दाखवला बाहेरचा रस्ता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - भारतीय कसोटी संघातून खेळण्याचं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. मात्र अगदीच मोजक्या खेळाडूंची संघात निवड होते आणि त्यातील काहींनाच प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळते. इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघातून एका स्फोटक सलामीवीराला निवड समितीने डच्चू दिला आहे. त्यामुळे त्याची कारकीर्द जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समितीने विस्फोटक फलंदाज मयंक अग्रवाल याला बाहेरची वाट दाखवली आहे. मयंक अग्रवालला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत फारशी कमाल दाखवता आली नव्हती. तसेच गेल्या बऱ्याच काळापासून त्याची बॅट शांत आहे. आयपीएलमध्येही त्याने निराशा केली होती. मयांक अग्रवालने २१ कसोटी सामन्यांमध्ये १४८८ धावा बनवल्या आहेत. त्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याने मयांकची कारकीर्द संकटात सापडली आहे.

मयांक अग्रवाल आयपीएल २०२२ मध्ये पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्याने २०२२मध्ये खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये १९६ धावाच जमवल्या होत्या. त्याच्या खराब फॉर्मचा फटका पंजाबच्या संघाला बसला होता. सातत्याने अपयशी ठरल्याने त्याने आपल्या फलंदाजीचा क्रमही बदलला होता. मात्र त्याला संघाचे भाग्य बदलता आले नव्हते. मयांक अग्रवालला धावा जमवता न आल्याने पुढील फलंदाजांवर दबाव वाढत होता.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात आयोजित पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चार सामने गतवर्षी खेळले गेले होते. मात्र पाचवा सामना कोरोनामुळे पुढे ढकलावा लागला होता. आत आहा सामना ७ जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी रिद्धिमान साहा आणि इशांत शर्माचीही संघात निवड करण्यात आलेली नाही.

या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ पुढील प्रमाणे 
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जयप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा. ो

Web Title: The career of this explosive opener Mayank Agarwal has come to an end? The selection committee showed the way out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.