मुंबई : खराब फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरू संघाला गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर नमविण्याचे मुंबई संघावर दडपण असेल. बंगळुरूने पाचपैकी चार, तर मुंबईने चारपैकी तीन सामने गमावले आहेत. मुंबईने मागच्या सामन्यात दिल्लीचा २९ धावांनी पराभव केला होता. परंतु, मुंबई-बंगळुरू यांच्यातील मागील पाचपैकी चार सामन्यांत बंगळुरुने बाजी मारली असल्याने मुंबईकरांवर दडपण असेल. दुसरीकडे विराटच्या शानदार कामगिरीनंतरही बंगळुरू संघ पराभव टाळण्यात अपयशी ठरला आहे.
मुंबई संघ
n ईशान, रोहितने धावा केल्या, मात्र मधली फळी अपयशी ठरली. कर्णधार हार्दिक पांड्यासह पुनरागमन करणाऱ्या सूर्यकुमार यादवला फलंदाजीत ‘दम’ दाखवावा लागेल.
n नेहमी पराभवानंतर सावरणाऱ्या मुंबईला आता उशीर झाल्यास बाहेर जावं लागेल, हे लक्षात घ्यावे लागेल. बंगळुरूला नमवून मुंबई चेन्नईविरुद्ध सज्ज होईल.
बंगळुरू संघ
n कोहलीचा अपवाद वगळता कर्णधार डुप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन अपयशी ठरले. वानखेडे स्टेडियमवर विराट पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडेल का, याकडे लक्ष लागले आहे.
n मुख्य गोलंदाज प्रभावहीन ठरले. मॅक्सवेलने मात्र चार बळी घेतले आहेत. सिराज, ग्रीन, अल्झारी जोसेफ यांच्यावर धावा रोखण्याची जबाबदारी असेल.
सामना : सायंकाळी ७:३० पासून
Web Title: The challenge for Mumbai is to beat Bangalore at home in IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.