Join us  

वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात दोन स्फोटक फलंदाजांची एंट्री, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार 

Ind Vs WI: गुरुवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपल्या संघात दोन स्फोटक फलंदाजांचा समावेश केला आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 1:22 PM

Open in App

दुसऱ्या कसोटीचा पाचवा दिवस मुसळधार पावसामुळे वाया गेल्याने भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. तसेच मालिका २-० अशा फरकाने जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगले. मात्र कसोटी मालिका १-० अशा फरकाने जिंकल्यानंतर आता गुरुवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचं आव्हान भारतीय संघासमोर असेल. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपल्या संघात दोन स्फोटक फलंदाजांचा समावेश केला आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

कसोटी मालिका गमावल्यानंतर वेस्ट इंडिजने एकदिवसीय मालिकेसाठी तगड्या संघाची निवड केली आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपल्या एकदिवसीय संघात शिमरॉन हेटमायर आणि ओशाने थॉमस यांचाय समावेश केल आहे. ओशाने थॉमसने सुमारे तीन वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन केलं आहे. तर निकोलस पूरन आणि जेसन होल्डर हे संघात निवडीसाठी उपलब्ध नव्हते.तर वेगवान गोलंदाज जेडन सिल्स आणि डावखुरा फिरकीपटू यनिक करिहा हे दुखापतीतून सावरून संघात परतले आहेत. तसेच फिरकीपटू गुडाकेश मोटी हासुद्धा दुखापतीतून सावरून संघात परतला आहे.

वेस्ट इंडिजचा वनडे संघ - शाई होप (कर्णधार), रोवमेन पॉवेल (उपकर्णधार), एलिख अथानाजे, यानिक करिहा, केसी कार्टी, डोमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, कायक मेयर्स, गुडाकेश मोटी, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर, ओशाने थॉमस.

भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका वेळापत्रकपहिला एकदिवसीय सामना - २७ जुलै, बार्बाडोस, संध्याकाळी ७ वाजता दुसरा एकदिवसीय सामना  - २९ जुलै, बार्बाडोस, संध्याकाळी ७ वाजता तिसरा एकदिवसीय सामान १ ऑगस्ट, त्रिनिदाद, संध्याकाळी ७ वाजता.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिज
Open in App