Virat Kohli Gautam Gambhir, IPL 2023: सोमवारी आयपीएल सामन्यानंतर झालेल्या विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची जोरदार चर्चा आहे. लोक त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. लखनौच्या एकना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान ही संपूर्ण घटना घडली. आता या वादात यूपी पोलीस उतरले आहेत. पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले आणि लिहिले, "कोणतीही समस्या आमच्यासाठी मोठी आणि गंभीर नाही. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ताबडतोब 112 डायल करा." त्यांनी पुढे लिहिले, "वाद टाळा, आम्हाला कॉल करायला संकोच करू नका. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 डायल करा."
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सामन्यानंतर कोहली आणि लखनौ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. दोन्ही संघाच्या खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला. प्रथम, गंभीरने कोहलीशी बोलत असलेल्या एलएसजी खेळाडूला आपल्याकडे ओढले आणि कोहलीपासून वेगळे केले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कोहली आणि गंभीर वाद घालताना दिसत आहेत. एलएसजी मेंटॉर गंभीर कोहलीने काही बोलल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहे, ज्यानंतर एलएसजी खेळाडूंनी त्यांच्या माजी भारतीय सहकाऱ्याला पुढे जाण्यापासून रोखले.
दरम्यान, कोहली आणि गंभीर या दोघांना आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, तर एलएसजीचा गोलंदाज नवीनला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर यूजर्स या दोघांच्या फोटोंवर मीम्सही बनवत आहेत. तर काही वापरकर्ते दोन्ही खेळाडूंवर टीका करत आहेत.
Web Title: The fight between the two...! Virat-Gambhir incident, UP Police's 'Mauke Pe Chauka'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.