The final words of MS Dhoni as a captain : कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे शेवटचे वाक्य काय होते?; अश्रू दाटून आलेल्या 'कॅप्टन कूल'चा Video viral

The final words of MS Dhoni the captain : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाच्या दोन दिवसांआधी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:38 PM2022-03-25T12:38:45+5:302022-03-25T12:42:21+5:30

whatsapp join usJoin us
The final words of MS Dhoni as a captain : CSK Captain Cool MS Dhoni Had Tears In His Eyes When He Says ‘Job Done’, Video Goes Viral | The final words of MS Dhoni as a captain : कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे शेवटचे वाक्य काय होते?; अश्रू दाटून आलेल्या 'कॅप्टन कूल'चा Video viral

The final words of MS Dhoni as a captain : कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे शेवटचे वाक्य काय होते?; अश्रू दाटून आलेल्या 'कॅप्टन कूल'चा Video viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

The final words of MS Dhoni the captain : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाच्या दोन दिवसांआधी महेंद्रसिंग धोनीनेचेन्नई सुपर किंग्सचे ( CSK) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. आयपीएल २०२२मध्ये रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) हा Chennai Super kings चा कर्णधार असणार आहे. धोनीच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असला तरी त्याने संघाच्या भविष्याचा विचार करून हे पाऊल उचलले आहे. ४० वर्षीय धोनी आणखी किती वर्ष आयपीएल खेळेल हे कुणालाच माहीत नाही, त्यामुळे CSKच्या संघबांधणीसाठी धोनीने हा निर्णय घेतला आहे. पण, धोनीच्या या निर्णयानंतर त्याचे दोन व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. एकात त्याच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये कर्णधार म्हणून त्याचे शेवटचे बोल चाहत्यांना प्रेरणा देत आहेत.

महेंद्रसिंग धोनीनंचेन्नई सुपर किंग्ससाठी २०४ सामन्यांत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आणि त्यात १२१ विजय मिळवले, तर ८२ सामन्यांत हार मानावी लागली. त्याच्या विजयाची सरासरी ही ५९.६०% आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने २०१०, २०११, २०१८ व २०२१ मध्ये आयपीएल जेतेपदं पटकावली. याशिवाय त्यांनी ९ वेळा आयपीएल फायनल गाठली. CSK च्या नावावर २ चॅम्पियन्स लीगचे जेतेपदंही आहेत.  

२०२० च्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीचा खेळ पाहून त्याने निवृत्ती घ्यावी अशी चर्चा रंगली. आयपीएल इतिहासात प्रथमच CSK प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकली नाही आणि गुणतालिकेत तळाला राहिला. IPL 2020 च्या अखेरच्या सामन्यात धोनीला हा तुझा पिवळ्या जर्सीतील शेवटचा सामना का?, असा प्रश्न विचारला, तेव्हा तो Definitely not असे म्हणाला होता. त्यानंतर आयपीएल २०२१मध्ये त्याने CSK ला चॅम्पियन बनवून टीकाकारांची बोलती बंद केली होती.

आयपीएल २०२१च्या जेतेपदानंतरच्या सोहळ्यातील हे व्हिडीओ आहेत. त्यात एकात प्रेझेंटेशन सेरेमनीत समालोचक हर्षा भोगले म्हणाले होते की, CSK साठी तू एक लेगसी मागे सोडून जात आहेस आणि त्यांना ती पुढे न्यायची आहे. त्यावर धोनी म्हणालेला की, अजूनही मी इथेच आहे... 


दुसऱ्या व्हिडीओत धोनी भावनिक झाल्याचे दिसत आहे.

 

Web Title: The final words of MS Dhoni as a captain : CSK Captain Cool MS Dhoni Had Tears In His Eyes When He Says ‘Job Done’, Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.