Join us  

International League T20 : मुंबई इंडियन्सच्या संघाचे वेळापत्रक जाहीर, किरॉन पोलार्ड पुन्हा मैदानावर धुमाकूळ घालणार, पाहा कधी व कुठे खेळणार  

International League T20 : दुबईत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 5:38 PM

Open in App

International League T20 : दुबईत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर या लीगचे थाटामाटात उद्घाटन होणार आहे. १३ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, २०२३ या कालाधीत ही लीग खेळवण्यात येणार आहे. अबु धाबी जयेद क्रिकेट स्टेडियमवर १४ जानेवारीला पहिला सामना होणार आहे आणि सलामीचा सामना दुबई कॅपिटल्स विरुद्ध अबुधाबी नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. रिलायन्स ग्रुपच्या मुंबई फ्रँचायझीच्या MI Emirates आणि कॅप्री ग्लोबल्सच्या शारजाह वॉरियर्स यांच्यातल्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. १७ जानेवारीला शारजाह क्रिकेट स्टेडियमवर ही लढत होईल.

अबुधाबी येथे १०, दुबईत १६ आणि शाहजाह येथे ८ सामने खेळवण्यात येणार आहेत. शिमरोन हेटमायर, मोईन अली, किरॉन पोलार्ड आणि वनिंदू हसरंगा या ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट स्टार्सची तुफान फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या सामन्यात विकेंडला डबल हेडर सामने होतील आणि एकूण  ३४ सामने खेळवले जातील. सहा फ्रँचायझी एकमेकांविरुद्ध दोनवेळा खेळतील. अबुधाबी नाइट रायडर्स, डेजर्ट व्हायपर्स, दुबई कॅपिटल्स, गल्फ जायंट्स, MI एमिरेट्स आणि शारजा वॉरियर्स यांच्यात हे सहभागी संघ आहेत.

MI Emirates चे वेळापत्रक

  • १४ आणि १७ जानेवारी - वि. शारजा वॉरियर्स
  • २१ जानेवारी - वि. नाइट रायडर्स
  • २२ जानेवारी - वि. दुबई कॅपिटल्स
  • २४ जानेवारी - वि. डेजर्ट व्हायपर्स
  • २७ जानेवारी - वि. गल्फ जायंट्स
  • २९ जानेवारी - वि. डेजर्ट व्हायपर्स
  • १ फेब्रुवारी - वि. गल्फ जायंट्स
  • ३ फेब्रुवारी - वि. नाइट रायडर्स
  • ५ फेब्रुवारी - वि. दुबई कॅपिटल्स

MI Emirates मध्ये किरॉन पोलार्डड्वेन ब्राव्हो हे ट्वेंटी-२०तील महान फलंदाज खांद्याला खांदा लावून खेळताना दिसणार आहेत. The Hundred लीगमधील पहिला शतकवीर  २० वर्षीय विल स्मीद हाही MI Emirates चा सदस्य आहे.  पोलार्ड,  ब्राव्हो, निकोलस पूरन, ट्रेंट बोल्ट, अँड्य्रू फ्लेचर, इम्रान ताहीर, समित पटेल, विल स्मीद, जॉर्डन थॉम्पसन, नजिबुल्लाह झाद्रान, झहीर खान, फझलहक फारूकी, ब्रॅडली व्हिल, बॅस डे लीड असा १४ सदस्यीय संघ MI Emirates चा आहे.  

न्यूझीलंडचा गोलंदाज शेन बाँड हा MI Emirates चा मुख्य प्रशिक्षक असणार आहे, तो सध्या मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट स्काऊट मधील पार्थिव पटेल व विनय कुमार हे प्रशिक्षकाच्या जबाबदारीत पदार्पण करत आहेत. पार्थिवकडे फलंदाजी प्रशिक्षकपद, तर विनयकडे गोलंदाजी प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू खेळाडू जेम्स फ्रँकलिन हा MI Emirates चा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक असणार आहे. रॉबीन सिंगकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि तो आता संघ व्यवस्थापक असेल.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :मुंबई इंडियन्सटी-20 क्रिकेटकिरॉन पोलार्डड्वेन ब्राव्हो
Open in App