भारतात ५ ऑक्टोबरला होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक फार उशीरा जाहीर झाले...पाकिस्तानचा सहभाग अन् बऱ्याच अडचणींमुळे वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब झाला. अखेर १०० दिवसांचा मुहूर्त साधून बीसीसीआय व आयसीसीने वेळापत्रक जाहीर केले. १५ ऑक्टोबर ही भारत-पाकिस्तान या महामुकाबल्याची तारीख ठरली.. आता सर्व सुरळीत होईल असे वाटत असताना नवं संकट आलं. १५ ऑक्टोबरला नवरात्री असल्यामुळे अहमदाबाद पोलिसांनी सुरक्षा पुरविण्यास अडचण येत असल्याचे सांगितले अन् INDvsPAK सामन्याच्या तारखेसह ९ सामन्यांमध्ये बदल करण्यात आले. १४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.
चला आता सर्व ठिक आहे असे वाटत असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचं ( HCA) बीसीसीआयला पत्र गेलं अन् ९ व १० ऑक्टोबर असे सलग दोन सामने आयोजित करता येणार नसल्याचे त्यांनी त्यात लिहिलं. ९ ऑक्टोबरल न्यूझीलंड वि. नेदरलँड्स असा सामना होणार आहे आणि त्याला येथील पोलिसांनी सुरक्षा पुरवण्यास अडचण नसल्याचे सांगितले. पण, लगेच दुसऱ्या दिवशी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका असा सामना होणार आहे, परंतु त्याला सुरक्षा पुरविण्यावरून पोलिसांनी नकार दिलाय. त्यामुळे आता पुन्हा वेळापत्रकात बदल होण्याची चर्चा सुरू झालीय. आधी हा सामना १२ ऑक्टोबरला होणार होता, परंतु भारत-पाकिस्तान सामन्यामुळे तो १० ऑक्टोबरला हलवला गेला.
आता यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख नजम सेठी यांनी बीसीसीआयला टोमणा मारला आहे. त्यांनी ट्विट केले की, बीसीसीआयने माझा सल्ला ऐकायला हवा. तो म्हणजे पाकिस्तानचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने दुसऱ्या देशात खेळवायला हवेत. दर काही दिवसांनी वेळापत्रकातला गोंधळ समोर येतोय.
Web Title: The former PCB chairman took a crushing dig at BCCI after report of another possible schedule tweak in the 2023 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.