Join us  

पावसामुळे खेळ थांबला, अफगाणिस्तानने ११२ धावा केल्या; भारत सुवर्णपदक पटकावणार?

IND vs AFG Final: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासाठीचा सामना सुरु आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 2:09 PM

Open in App

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासाठीचा सामना सुरु आहे. यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र दोन षटकांचा खेळ उरला असताना पावसाने खोडा घातला. सध्या पावसामुळे खेळ थांबविण्यात आला आहे. अफगाणिस्तानने फलंदाजी करत १८.२ षटकांत ५ विकेट्स गमावत ११२ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद याने प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.

शिवम दुबेने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने झुबैद अकबरीला झेलबाद केले. अर्शदीप सिंगने दुसरी विकेट घेत मोहम्मद शहजादला माघारी पाठवले. त्याने मोहम्मद शहजादला झेलबाद केले. शहजादने सहा चेंडूत चार धावा केल्या. अफगाणिस्तानने तीन षटकांत दोन गडी बाद १० धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानला तिसरा धक्का नूर अली जद्रानच्या रूपाने बसला. 

चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नूर अली धावबाद झाला. रवी बिश्नोईने त्याला धावबाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. त्याने १०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अफसर झाझाईला त्रिफळाचीत केले. शाहबाज अहमदने भारताला पाचवे यश मिळवून दिले. त्याने ११व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर करीम जानतला त्रिफळाचीत केले. शहिदुल्ला कमाल आणि गुलबदिन नाइब यांनी ६० धावांची भागिदारी करत संघाला सावरले. 

अफगाणिस्तान पहिल्यांदाच फायनलमध्ये-

दुसऱ्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा ४ गड्यांनी फडशा पाडत दिमाखात अंतिम फेरी गाठली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात फायनलमध्ये पोहचण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ ठरली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १८ षटकांत १२५ धावांत तंबूत परतला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने १७.४ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पाकिस्तानने दिलेले लक्ष्य पूर्ण केले. अफगाणिस्तानकडून तूर अली झादानने सर्वाधिक ३९ धावा केल्या. कर्णधार गुलबदीन नबने [ २६* ] अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला होता.

 

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३भारतीय क्रिकेट संघभारतअफगाणिस्तान