Join us  

मोदी सरकारचा BCCI कडे महत्त्वाचा प्रस्ताव, २२ ऑगस्टला भारतीय संघाला 'या' संघाविरुद्ध खेळवा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाराने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( BCCI) एका क्रिकेट  सामन्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 4:42 PM

Open in App

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाराने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( BCCI) एका क्रिकेट  सामन्याच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २२ ऑगस्टला भारत विरुद्ध जागतिक एकादश ( India Vs the rest of the world ) अशा सामन्याचे आयोजन करण्यात यावे असा प्रस्ताव ठेवला आहे.  सांस्कृतिक मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती PTI ला दिली आहे आणि याबाबत त्यांच्याकडून  बीसीसीआयशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या सामन्यात भारताच्या स्टार खेळाडूंसह परदेशातील काही दिग्गजांच्या समावेशाची मंत्रालयाला अपेक्षा आहे. 'Azadi ka Amrit Mahotsav' या मोहिमेंतर्गत ही मॅच होणार आहे.

या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. पण, भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक व अन्य बाबींचा विचार करण्यात येईल, असेही स्पष्ट केले गेले. ''India XI vs World XI असा सामना २२ ऑगस्टला आयोजित करावा, असा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. जागतिक एकादश संघासाठी किमान १३-१४ आंतरराष्ट्रीय खेळाडू हवेत. त्यांच्या उपलब्धतेबाबत आम्ही चाचपणी सुरू केली आहे.''असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.  

या कालावधीत इंग्लंडमध्ये स्थानिक क्रिकेट सुरू असते आणि कॅरेबियन प्रीमिअर लीगही सुरू असणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू हवे असतील तर बीसीसीआयला त्यांची आर्थिक सोयही करावी लागेल.  भारतीय संघही या कालावधीत तीन वन डे सामन्यांसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर असणार आहे आणि २० ऑगस्टला हा दौरा संपणार आहे. पण, दोनच दिवसात भारतात येऊन खेळणे खेळाडूंना शक्य नाही. दरम्यान, विराट कोहली, रोहित शर्मा व रिषभ पंत यांना त्या दौऱ्यावर विश्रांती दिली जाऊ शकते आणि ते २२ ऑगस्टला खेळू शकतील.   

टॅग्स :बीसीसीआयनरेंद्र मोदी
Open in App