Join us

Shane Warne : शेन वॉर्नला डेट केल्याचा जगातल्या सर्वात 'हॉट' आजीचा दावा, उडाली एकच खळबळ...

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) हा बिनधास्त आयुष्य जगला. त्याची जीवनशैली नेहमी चर्चेत राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:15 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) हा बिनधास्त आयुष्य जगला. त्याची जीवनशैली नेहमी चर्चेत राहिली आणि त्याचे अनेक महिलेंसोबत संबंध होते असेही सांगण्यात येत आहे. त्याच्या निधनानंतरही त्याच्या महिलांसोबतच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. त्यात world's hottest grandma अशी ओळख असलेल्या गिना स्टीवर्ट ( Gina Stewart) हिनेही महान फिरकीपटूसोबत अफेअर असल्याच्या दाव्याने खळबळ माजली आहे. 

सेलिब्रेटी असलेल्या गिनाने मोठे दावे केले आहेत. तिने केलेल्या दाव्यानुसार निधनापूर्वी वॉर्नने तिला डेट केले होते. पण, वॉर्नला त्यांचे नाते जगजाहीर करायचे नव्हते, असेही ती म्हणाली. ''गेल्या काही महिन्यांपासून मी उद्ध्वस्त झाले आहे. जगाने एक दिग्गज गमावला आणि मी एक मित्र आणि विश्वासू गमावला. हे अकल्पनीय घडले. मी शेनला डेट करत होते पण ते फारसे कुणाला माहीत नव्हते. त्याला ते जगजाहीर करायचे नव्हते," असे ती म्हणाली.  

२०१८ला गोस्ट कोस्ट येथे वॉ़र्नसोबत पहिली भेट झाल्याचे गिनाने सांगितले आणि त्यावेळी दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. त्यानंतर त्याचं नातं फुलत गेलं आणि दोघं एकमेकांच्या जवळ आले. ''क्रिकेट सामन्यानंतर तो मला भेटायला आला. आम्ही ती संपूर्ण रात्र सोबत घालवली, तेव्हा आम्ही एकमेकांशी गप्पा मारल्या आणि एकमेकांना समजण्याचा प्रयत्न केला. तो मला खूप आवडला आणि मला त्याच्या आयुष्याबद्दल ऐकायला आवडले. आम्ही खूप जवळ आलो आणि मी त्याला वचन दिले की मी आमचं हे नातं लोकांच्या नजरेतून दूर ठेवेन,''असेही तिने म्हटले. 

 ती पुढे म्हणाली, त्या वेळी मला paparazziपासून सावधगिरी बाळगावी लागली, कारण मी जिथे राहत होते तिथे माझा फोटो काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. शेन आणि मी बाहेर जाण्यासाठी टोपी आणि सनग्लासेस घालायचो. शेन तेव्हा मीडियाच्या वागण्यावर नाखूश होता आणि हे नातं बाहेर पडू नये असे त्याला वाटायचे आणि त्यामुळे सर्व काही गुप्त ठेवावे लागले.  

टॅग्स :शेन वॉर्नआॅस्ट्रेलिया
Open in App