Smriti Mandhana:मराठमोळ्या स्मृती मानधनाचा रूद्रावतार! अर्धशतकी खेळी करून मिळवला मोठा विजय 

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने पुन्हा एकदा आक्रमक खेळी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 02:30 PM2022-08-26T14:30:47+5:302022-08-26T14:31:49+5:30

whatsapp join usJoin us
The hundred women India's Smriti Mandhana scored a 31-ball 57 watch the video  | Smriti Mandhana:मराठमोळ्या स्मृती मानधनाचा रूद्रावतार! अर्धशतकी खेळी करून मिळवला मोठा विजय 

Smriti Mandhana:मराठमोळ्या स्मृती मानधनाचा रूद्रावतार! अर्धशतकी खेळी करून मिळवला मोठा विजय 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) पुन्हा एकदा आक्रमक खेळी केली आहे. द हंड्रेडमध्ये (The Hundred) ताबडतोब फलंदाजी करून स्मृतीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर सदर्न ब्रेव्हने ट्रेंट रॉकेट्सच्या संघाचा 10 बळी राखून पराभव केला. मानधनाने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

ट्रेंट रॉकेट्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 100 चेंडूंमध्ये 8 गडी गमावून 88 धावा केल्या. सदर्न ब्रेव्हकडून प्रत्युत्तरात लॉरेन बेलने 20 चेंडूत 10 धावा देऊन 4 बळी पटकावले. लॉरेनच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर सदर्नच्या संघाने सामन्यात मजबूत पकड बनवली. छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या मानधना आणि इंग्लंडच्या डॅनी वॅटने 44 चेंडू राखून संघाला मोठा विजय मिळवून दिला. वॅटने 25 चेंडूंत 36 धावांची साजेशी खेळी केली. 

सदर्न ब्रेव्हचा मोठा विजय 
मानधनाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली, ज्यासाठी तिला ओळखले जाते. तिने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून श्रीगणेशा केला आणि केवळ 30 चेंडूंत आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे विजयी षटकार लगावून स्मृतीने सदर्न ब्रेव्हच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सदर्न ब्रेव्हचा साखळी फेरीतील शेवटचा सामना 31 ऑगस्ट रोजी नॉदर्न सुपरचार्जर्सविरूद्ध होणार आहे. 

 


 

Web Title: The hundred women India's Smriti Mandhana scored a 31-ball 57 watch the video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.