Join us  

ICC World Cup 2023 : ICC अन् BCCI ने मिळून पाकिस्तानचा 'गेम' केला; वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आले मोठे अपडेट्स

ICC World Cup 2023 : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न येण्याचा सातत्याने बहाणा शोधणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा ( PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) आणि BCCI ने गेम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 3:59 PM

Open in App

ICC World Cup 2023 : आयसीसीवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न येण्याचा सातत्याने बहाणा शोधणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा ( PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) आणि BCCI ने गेम केला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे पाकिस्तान संघाच्या सामन्यांचे स्थळ बदलण्याची मागणी केली होती, परंतु ICC व BCCI या दोघांनी त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. भारतात ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप होणार आहे. त्यापूर्वी २० जूनला एक बैठक झाली आणि त्यात PCB च्या मागण्यांवर चर्चा झाली. त्यानुसार त्या मागण्या मान्य होणार नसल्याचे PCB ला कळवले गेले आहे.

Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार आता पाकिस्तानला BCCI ने सादर केलेल्या ड्राफ्टनुसार खेळावे लागणार आहे. पाकिस्तानने चेन्नई आणि बंगळुरू येथील सामन्यांची अदलाबदल करण्याची मागणी केली होती. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईत, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळुरूत होणार आहे. पण, चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असल्याने आणि अफगाणिस्तानकडे चांगले फिरकीपटू असल्याने पाकिस्तानने हा सामना बंगळुरूत खेळवण्याची मागणी केली. बंगळुरूत होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना चेन्नईत खेळण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. 

पण, आयसीसी आणि बीसीसीआय यांच्या म्हणण्यानुसार स्थळ बदलण्याची ही वेळ नाही आणि तसं कारणही नाही. त्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सामने होतील, काही बदल करायचा असल्यास ICC ची परवानगी घ्यावी लागेल. अद्याप आयसीसीने वेळापत्रक जाहीर केलेले नाही आणि २७ जूनला त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने चेन्नई आणि बंगळुरू हे पाकिस्तानसाठी सुरक्षित ठिकाणं आहेत. पण, PCB प्रमुख नजम सेठी यांनी अहमदाबाद येथील भारत-पाकिस्तान सामन्यावरही आक्षेप घेतला होता. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना धर्मशालावरून कोलकाता येथे सुरक्षेच्या कारणामुळे हलवला गेला होता.  

 ड्राफ्ट नुसार १५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान लढत अहमदाबाद येथे होणार आहे. पाकिस्तान ६ आणि १२ ऑक्टोबर रोजी क्वालिफायरमधून प्रगती करणाऱ्या दोन संघांविरुद्ध आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( २० ऑक्टोबर, बंगळुरू), अफगाणिस्तान ( २३ ऑक्टोबर) आणि दक्षिण आफ्रिका ( २७ ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध चेन्नईत सामना होईल. बांगलादेश (३१ ऑक्टोबर, कोलकाता), न्यूझीलंड ( ५ नोव्हेंबर, बंगळुरू) आणि इंग्लंड ( १२ नोव्हेंबर, कोलकाता) येथे पाकिस्तानचे सामने होतील.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानआयसीसी
Open in App