India vs Sri Lanka : भारतीय संघाने रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळलेल्या पहिल्याच कसोटी मालिकेत श्रीलंकेवर २-० असे निर्भेळ यश मिळवले. बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी ( Pink Ball Test) कसोटी खेळवण्यात आली आणि भारताने २३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचे ४४७ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २०८ धावांवर तंबूत परतला. भारतीय संघाने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ( ICC World Test Championship Standings) सुधारणा केली, परंतु आज ICCने या खेळपट्टीला 'Below Average'चा शेरा दिला.
ICC च्या नियमानुसार खेळपट्टीला पाच वजा गुण मिळाल्यास या खेळपट्टीवर १२ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी घातली जाईल. या कसोटीत भारताने WTC गुणताकिते चौथे स्थान पटकावले होते आणि ICCच्या या कारवाईचा त्या क्रमवारीवर काहीच परिणाम होणार नाही.