लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश ! 

सर्वप्रथम पॅरिसमध्ये १९०० ला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा खेळ होता. त्यावेळी ब्रिटन आणि फ्रान्स हे दोनच संघ होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 05:38 AM2022-08-05T05:38:36+5:302022-08-05T05:39:04+5:30

whatsapp join usJoin us
The inclusion of cricket in the Los Angeles Olympics! | लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश ! 

लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश ! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लुसाने : क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता बळावली आहे.  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरात २०२८ ला होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी ज्या नऊ खेळांची समीक्षेसाठी निवड केली त्यात क्रिकेटचा समावेश आहे. क्रिकेटला केवळ चार वेळा ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले.

सर्वप्रथम पॅरिसमध्ये १९०० ला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा खेळ होता. त्यावेळी ब्रिटन आणि फ्रान्स हे दोनच संघ होते. लॉस एंजिलिस आयोजन समिती आणि आयओसीने  आयसीसीला सादरीकरणासाठी आमंत्रित केले होते. एक दिवसानंतर क्रिकेटचा समीक्षेसाठी विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
   यावर अंतिम निर्णय मात्र मुंबईत २०२३ ला होणाऱ्या आयओसी सत्राआधी  घेतला जाईल. ज्या अन्य खेळांची समीक्षा होणार आहे त्यात  बेसबॉल - सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस, ब्रेक डान्सिंग, कराटे, किकबॉक्सिंग, स्क्वॅश आणि मोटरस्पोर्टचा समावेश आहे.

आयओसीनुसार ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्यासाठी क्रिकेटला काही अटींची पूर्तता करावी लागेल. त्यात कमी  गुंतवणूक  तसेच कमी गुंतागुंत, सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा समावेश, यजमान देशाचे हित जोपासणे, लैंगिक समानता पाळणे, दीर्घकालीन स्थिरता राखणे या त्या अटी असतील. 
  सध्याच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट खेळले जात आहे.  त्यात आठ देशांचे संघ सहभागी झाले.  ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील समावेशासाठी  महिला आणि पुरुष प्रकार आवश्यक असतो. आयसीसीचे सीईओ ज्योफ अलार्डिस यांच्या मते, बर्मिंगहॅम राष्ट्रकुलमध्ये क्रिकेट हा खेळ आकर्षण ठरला, त्यावर मी आनंदी आहे. मैदानात आणि टीव्हीवर हा खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांचे आयसीसी विशेष आभार मानते, असे अलार्डिस म्हणाले.

लोकमतने वर्तविले होते भाकीत
रविवारच्या साप्ताहिक स्तंभात लोकमतचे कन्सल्टिंग एडिटर अयाझ मेमन यांनी अफाट लोकप्रियतेमुळे क्रिकेटचा २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये समावेश होऊ शकतो, असे भाकीत वर्तवले होते. ते आता खरे ठरण्याची शक्यता आहे. 

 २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये २८ खेळांचा समावेश असेल असे आयओसीने यंदा म्हटले होते.  युवकांना जोडण्यासाठी संभाव्य नव्या खेळांचा विचार करू, असेही सांगण्यात आले होते.
 

Web Title: The inclusion of cricket in the Los Angeles Olympics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.