IND vs WI series : भारत-वेस्ट इंडिज मालिकेच्या वेळापत्रकात होणार बदल? समोर येतंय महत्त्वाचं कारण

IND vs WI series :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या मालिकेत बदल होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 05:31 PM2023-06-21T17:31:59+5:302023-06-21T17:32:10+5:30

whatsapp join usJoin us
The India tour of West Indies is in a scheduling? WI stars in schedule conflict as WC Qualifiers threaten 1st Test | IND vs WI series : भारत-वेस्ट इंडिज मालिकेच्या वेळापत्रकात होणार बदल? समोर येतंय महत्त्वाचं कारण

IND vs WI series : भारत-वेस्ट इंडिज मालिकेच्या वेळापत्रकात होणार बदल? समोर येतंय महत्त्वाचं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI series :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या मालिकेत बदल होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 1 जुलैला विंडीज दौऱ्यासाठी रवाना होईल आणि 12 जुलैपासून पहिली कसोटी खेळणार आहे. पण, सध्या झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडिजचा संघ खेळतोय आणि 9 जुलैला ही स्पर्धा संपणार आहे. हरारे ते रोसीयू या प्रवासाला दोन दिवस लागतात आणि त्यामुळे पहिल्या कसोटीची तारीख बदलली जाऊ शकते.   


वेस्ट इंडिजचा वन डे व कसोटी संघ वेगळा असला तरी जेसन होल्डर, कायले मायर्स, रोस्टन चेस व अल्झारी जोसेफ हे दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात आणि हे सर्व सध्या झिम्बाब्वेत आहेत. 18 जूनला अमेरिकेविरुद्ध झालेल्या वन डे सामन्यात विंडीजने 39 धावांनी विजय मिळवला आणि त्या संघात हे चारही खेळाडू होते. ''वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेच्या फायनलला तसा अर्थ नाही, त्यामुळे हे चार खेळाडू त्यात खेळणार नाहीत, परंतु त्याआधी आम्हाला फायनलसाठी पात्र ठरावे लागेल,''असे वेस्ट इंडिज बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले.  


 IND vs WI Schedule
कसोटी मालिका
पहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) 
दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) 
 
वन डे मालिका
पहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 

ट्वेंटी-२० मालिका
पहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: The India tour of West Indies is in a scheduling? WI stars in schedule conflict as WC Qualifiers threaten 1st Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.