IND vs WI series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या मालिकेत बदल होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 1 जुलैला विंडीज दौऱ्यासाठी रवाना होईल आणि 12 जुलैपासून पहिली कसोटी खेळणार आहे. पण, सध्या झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडिजचा संघ खेळतोय आणि 9 जुलैला ही स्पर्धा संपणार आहे. हरारे ते रोसीयू या प्रवासाला दोन दिवस लागतात आणि त्यामुळे पहिल्या कसोटीची तारीख बदलली जाऊ शकते.
वेस्ट इंडिजचा वन डे व कसोटी संघ वेगळा असला तरी जेसन होल्डर, कायले मायर्स, रोस्टन चेस व अल्झारी जोसेफ हे दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात आणि हे सर्व सध्या झिम्बाब्वेत आहेत. 18 जूनला अमेरिकेविरुद्ध झालेल्या वन डे सामन्यात विंडीजने 39 धावांनी विजय मिळवला आणि त्या संघात हे चारही खेळाडू होते. ''वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेच्या फायनलला तसा अर्थ नाही, त्यामुळे हे चार खेळाडू त्यात खेळणार नाहीत, परंतु त्याआधी आम्हाला फायनलसाठी पात्र ठरावे लागेल,''असे वेस्ट इंडिज बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
IND vs WI Scheduleकसोटी मालिकापहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) वन डे मालिकापहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)
ट्वेंटी-२० मालिकापहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)