IPL Auction 2023 : ना बेन स्टोक्स, ना सॅम कुरन IPL Mock Auction मध्ये २० कोटींचा मानकरी ठरला भलताच खेळाडू

IPL Auction 2023: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या मिनी ऑक्शनसाठी आता २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 06:09 PM2022-12-22T18:09:06+5:302022-12-22T18:09:28+5:30

whatsapp join usJoin us
The IPL 2023 Mini Auction is less than 24 hours away, Cameron Green costliest buy in IPL Mock Auction, Sam Curran and Ben Stokes attract big bids   | IPL Auction 2023 : ना बेन स्टोक्स, ना सॅम कुरन IPL Mock Auction मध्ये २० कोटींचा मानकरी ठरला भलताच खेळाडू

IPL Auction 2023 : ना बेन स्टोक्स, ना सॅम कुरन IPL Mock Auction मध्ये २० कोटींचा मानकरी ठरला भलताच खेळाडू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2023: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या मिनी ऑक्शनसाठी आता २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.  या लिलावात ३६९ खेळाडूंवर बोली लागणार आहे. फ्रँचायाझींनी अतिरिक्त ३६ खेळाडूंची नावं सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या ४०५ अशी झाली आहे. यामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि २८२ खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. आयपीएल फ्रँचायझींनी आतापर्यंत ७४३.५ कोटी रुपये लिलावात खर्च केले आहेत आणि २३ डिसेंबरला २०६.५ कोटी ८६ खेळाडूंसाठी खर्च होणे अपेक्षित आहेत. यानंतर आयपीएल लिलावात खेळाडूंच्या पगारासाठी एकूण ९५० कोटी खर्च झालेले असतील.

आयपीएल २०२३ एक आठवडा विलंबाने सुरू होणार, ठरली तारीख; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स 

आयपीएलच्या या लिलावात २० कोटींचा टप्पा ओलांडला जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. कारण, बेन स्टोक्स, सॅम कुरन, कॅमेरून ग्रीन आदी तगडे खेळाडू लिलावात उतरले आहेत. प्रत्येक फ्रँचायझीला आपल्या ताफ्यात तगडा अष्टपैलू खेळाडू हवा आहे आणि त्यासाठी हवा तेवढा पैसा ओतण्याची त्यांची तयारी आहे. आयपीएलच्या या लिलावापूर्वी Jio Cinema ने घेतलेल्या कार्यक्रमात mock auction ( नकली लिलाव) झाला. त्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा अनसोल्ड राहिला.

माजी क्रिकेटपटू अनील कुंबळे, सुरेश रैना, ख्रिस गेल, इयॉन मॉर्गन, स्कॉट स्टायरीस, रॉबीन उथप्पा, हे जिओ सिनेमाच्या नकली लिलावात सहभागी झाले होते.  


ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याला या लिलावात सर्वाधिक बोली लागली गेली आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्कॉट स्टायरीस यांनी त्याच्यासाठी २० कोटी रक्कम बोली लावली.  

आयपीएलच्या नकली लिलावातील महागडे खेळाडू 
कॅमेरून ग्रीन - २० कोटी ( हैदराबाद)
सॅम कुरन - १९.५० कोटी ( चेन्नई)
बेन स्टोक्स - १९ कोटी ( पंजाब)
ओडिन स्मिथ - ८.५ कोटी ( मुंबई)
निकोलस पूरन - ८.५ कोटी ( लखनौ) 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: The IPL 2023 Mini Auction is less than 24 hours away, Cameron Green costliest buy in IPL Mock Auction, Sam Curran and Ben Stokes attract big bids  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.