IPL Auction 2023: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या मिनी ऑक्शनसाठी आता २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. या लिलावात ३६९ खेळाडूंवर बोली लागणार आहे. फ्रँचायाझींनी अतिरिक्त ३६ खेळाडूंची नावं सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या ४०५ अशी झाली आहे. यामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि २८२ खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. आयपीएल फ्रँचायझींनी आतापर्यंत ७४३.५ कोटी रुपये लिलावात खर्च केले आहेत आणि २३ डिसेंबरला २०६.५ कोटी ८६ खेळाडूंसाठी खर्च होणे अपेक्षित आहेत. यानंतर आयपीएल लिलावात खेळाडूंच्या पगारासाठी एकूण ९५० कोटी खर्च झालेले असतील.
आयपीएल २०२३ एक आठवडा विलंबाने सुरू होणार, ठरली तारीख; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स
आयपीएलच्या या लिलावात २० कोटींचा टप्पा ओलांडला जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. कारण, बेन स्टोक्स, सॅम कुरन, कॅमेरून ग्रीन आदी तगडे खेळाडू लिलावात उतरले आहेत. प्रत्येक फ्रँचायझीला आपल्या ताफ्यात तगडा अष्टपैलू खेळाडू हवा आहे आणि त्यासाठी हवा तेवढा पैसा ओतण्याची त्यांची तयारी आहे. आयपीएलच्या या लिलावापूर्वी Jio Cinema ने घेतलेल्या कार्यक्रमात mock auction ( नकली लिलाव) झाला. त्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा अनसोल्ड राहिला.
माजी क्रिकेटपटू अनील कुंबळे, सुरेश रैना, ख्रिस गेल, इयॉन मॉर्गन, स्कॉट स्टायरीस, रॉबीन उथप्पा, हे जिओ सिनेमाच्या नकली लिलावात सहभागी झाले होते.
आयपीएलच्या नकली लिलावातील महागडे खेळाडू कॅमेरून ग्रीन - २० कोटी ( हैदराबाद)सॅम कुरन - १९.५० कोटी ( चेन्नई)बेन स्टोक्स - १९ कोटी ( पंजाब)ओडिन स्मिथ - ८.५ कोटी ( मुंबई)निकोलस पूरन - ८.५ कोटी ( लखनौ)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"