IPL 2024 Auction ची जोरदार तयारी; प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्समध्ये १०० कोटी, खेळाडू होणार मालामाल

मागच्या पर्वात पर्स रक्कम ९५ कोटी केल्याने कोट्यवधींची बोली लागलेली पाहायला मिळाली. सॅम कुरन, कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स आणि निकोलस पूरन या सर्वांनी १५ कोटींहून अधिक कमाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 08:14 PM2023-07-22T20:14:19+5:302023-07-22T20:14:28+5:30

whatsapp join usJoin us
The IPL 2024 Auction is likely to be held in late December, Franchises to have Rs 100 Cr purse in Auction  | IPL 2024 Auction ची जोरदार तयारी; प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्समध्ये १०० कोटी, खेळाडू होणार मालामाल

IPL 2024 Auction ची जोरदार तयारी; प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्समध्ये १०० कोटी, खेळाडू होणार मालामाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडयन प्रीमिअर लीग ही ट्वेंटी-२० फ्रँचायझी लीगमधील सर्वात श्रीमंत लीग आहे आणि BCCI ने आयपीएल २०२४ च्या तरायीला सुरुवात केली आहे. आयपीएल २०२४ साठीचा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे, परंतु लिलावाची तारीख ही नाताळच्या सुट्ट्यांमध्ये येऊ नये असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. सध्या हाती आलेल्या वृत्तानुसार आयपीएल लिलाव २०२४ साठी प्रत्येक फ्रँचायझीची पर्स रक्कम ही १०० कोटी करण्यात येणार आहे.  


“आता फोकस वर्ल्ड कपवर आहे आणि एकदा सर्व तपशीलांची काळजी घेतली की आम्ही आयपीएलचा विचार करू. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आम्ही आयपीएल २०२४ लिलावाची तारीख ठरवू. डिसेंबरच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात हा लिलाव होण्याची शक्यता आहे. आयपीएल गव्हर्निंग कौंन्सिलच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल,'' असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. “ हा लिलाव ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला नक्कीच होणार नाही. आम्ही सर्वांसाठी सोयीस्कर तारीख पाहण्याचा प्रयत्न करू,” असेही त्यांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले. 


यावेळचा आयपीएल लिलाव हा एक Mini Acution आहे, ज्यामध्ये खेळाडू कायम राखण्याच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. नवीन हंगामात त्यांचे बजेट कॅप मागील हंगामातील ९५ कोटी रुपयांवरून १०० कोटी रुपयांपर्यंत वाढलेले दिसेल. मागच्या पर्वात पर्स रक्कम ९५ कोटी केल्याने कोट्यवधींची बोली लागलेली पाहायला मिळाली. सॅम कुरन, कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स आणि निकोलस पूरन या सर्वांनी १५ कोटींहून अधिक कमाई केली.  हॅरी ब्रूकने सनरायझर्स हैदराबादकडून १३ कोटी रुपये मिळवले. 


डिसेंबरमध्ये जेव्हा लिलाव होईल तेव्हा पुन्हा अशाच प्रकारच्या खर्चाची अपेक्षा केली जाऊ शकते. फ्रँचायझींनी आगामी हंगामासाठी त्यांच्या योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे. तळापासून दुस-या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आधीच आपल्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांची छाटणी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने अँडी फ्लॉवरच्या जागी जस्टिन लँगरला स्थान दिले आहे. आरसीबीने संजय बांगर आणि माईक हेसन यांच्यापासून फारकत घेतली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स देखील नवीन प्रशिक्षकाच्या शोधात असलेल्या फ्रँचायझींमध्ये आहेत. 


BCCI लॉजिस्टिक समस्यांमुळे ख्रिसमसच्या जवळची कोणतीही तारीख टाळू इच्छित आहे. सुट्टीचा काळ असल्याने हॉटेल्स बुक करणे कठीण झाले आहे. ठिकाणाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तथापि, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, कोची आणि कोलकाता ही IPL 2024 लिलावासाठी संभाव्य ठिकाणे आहेत.  

Web Title: The IPL 2024 Auction is likely to be held in late December, Franchises to have Rs 100 Cr purse in Auction 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.