Join us  

Sourav Gangulyकडून अध्यक्षपद घेतलं, महिला IPLला मान्यता दिली; जाणून घ्या BCCIच्या बैठकित नेमकं काय घडलं

The key decisions made are as under 91st AGMof BCCI - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCC) आज ९१वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 3:34 PM

Open in App

The key decisions made are as under 91st AGMof BCCI - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCC) आज ९१वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात रॉजर बिन्नी यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. सौरव गांगुलीचा तीन वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ संपला. जय शाह हे सचिवपदी कायम राहिले, तर राजीव शुक्ला हे उपाध्यक्षपदी कायम राहिले. आशिष शेलार यांची खजिनदार म्हणून  निवड झाली. याशिवाय २०२३मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेला भारताला न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी घेण्याचा प्रस्ताव ठेवला गेला. आजच्या बैठकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला आयपीएल स्पर्धेला मान्यता देण्यात आली आहे.

तब्बल ९,६२९ कोटींच्या खजिन्याची चावी आशिष शेलार यांच्याकडे; BCCI ने दाखवलं 'पासबुक'

  1. बीसीसीआयची नवीन टीम 
  • अध्यक्ष - रॉजर बिन्नी 
  • उपाध्यक्ष - राजीव शुक्ला
  • सचिव - जय शाह
  • सरचिटणीस - देवजित सैकिया
  • खजिनदार - आशिष शेलार  

 

  1. सौरव गांगुलीचा 'डबल' गेम झाला! BCCI चं अध्यक्षपद गेलं अन् जय शाह अँड टीमने आणखी एक धक्का दिला

  2. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेवर एमकेजे मजुमदार यांची निवड  
  3. इंडियन प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग काऊंसिलवर अरुण सिंग धुमाळ व अविशेक दालमिया यांची निवड 
  4. २०१९ -२२ या तीन वर्षांच्या कार्यकाळात बीसीसीआयच्या तिरोजीत जवळपास ६००० कोटींची भर पडल्याची माहिती माजी खजिनदार अरुण धुमाळ यांनी  बैठकीत सांगितले. त्यामुळे आता नवे खजिनदार आशिष शेलार ( Ashish Shelar) यांच्या हातात ९६२९ कोटींच्या खजिन्याची चावी असणार आहे.
  5.  पुरूषांच्या २०२३-२०२७ व महिलांच्या २०२२-२०२५ या सालातील क्रिकेट स्पर्धांच्या दौऱ्यांवर चर्चा झाली. त्यानुसारच २०२३मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेला भारतीय पुरुष संघाला न पाठवण्याचा निर्णय झाला. ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.
  6. महिलांच्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेला मान्यता देण्यात आली असून ६ संघांमध्ये पुढील वर्षी महिला आयपीएल पार पडेल

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :बीसीसीआयसौरभ गांगुलीजय शाहआयपीएल २०२२
Open in App