टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या तलाकचे वृत्त सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासून, सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक यांचे संबंध बिघडल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही, तर हे दोघे वेगळे झाले असल्याचेही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये म्हटले जात आहे. मात्र, शोएब अथवा सानियाकडून यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
सानियाने दुबईतील घर सोडले -
सानिया आणि शोएब मलिक यांच्या तलकसंदर्भातील बातम्यांबाबत आता आलेले लेटेस्ट अपडेट म्हणजे, भारतीय टेनिस स्टार सानियाने दुबईतील घर सोडले आहे. खलीज टाइम्सच्या माध्यमाने ही माहिती समोर आली आहे. यात सांगण्यात आले आहे, की सानिया आणि शोएब हे दुबईमध्ये एक बंगल्यात सोबत राहत होते. मात्र, आता सानियाने हे घर सोडले आहे आणि आपले एक वेगळे घर घेतले आहे. महत्वाचे म्हणजे, सानिया आणि शोएब यांच्या जवळच्या काही लोकांनी, आता हे दोघे सोबत राहत नसल्याची पुष्टी केली आहे, असा दावा पाकिस्तानातील माध्यमांनी केला आहे.
12 वर्षांनंतर तलाक? -
सानिया आणि शोएब यांचे लग्न 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये झाले होते. त्यांनी 15 एप्रिलला लाहोरमध्ये मोठे रिसेप्शनही दिले होते. या जोडप्याला इझान नावाचा एक मुलगाही आहे. ज्याचा जन्म 2018 मध्ये झाला होता. लग्नाच्या 12 वर्षानंतर सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
Web Title: The latest update on tennis star Sania-Shoaib divorce rumours sania leaves dubai house
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.