कल्याण: मुदत ठेवीवर आकर्षक परतावा देतो तसेच गोल्ड स्किमच्या गुंतवणुकीमध्ये माफक दरात सोने व डायमंड देतो. त्याकरीता मासिक भिशी योजना आणि फिक्स डिपॉङिाट योजना सुरू असून त्यावर 15 ते 18 टकके व्याजदराने पैसे रिटर्न मिळतील असे आमिष दाखवून येथील पश्चिमेकडील शिवाजी चौक वल्लीपीर रोडवरील मे. एस कुमार गोल्ड अँण्ड डायमंड ज्वेलर्स दुकानाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकुमार पिल्लई यांनी ग्राहकांना लाखोंचा गंडा घालत कोटयावधी रूपयांचा अपहार केल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा त्यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
17 नोव्हेंबर 2019 ते 17 नोव्हेंबर 2021 या एक वर्षाच्या कालावधीत हा फसवणूकीचा प्रकार घडला आहे. 27 ग्राहकांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जावरून पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. ग्राहकांना जाहीरात करून तसेच आमिष दाखवित त्यांच्याकडून पैशांची गुंतवणूक करून घेतली परंतू त्यांचे सोने न देता तसेच त्यांचे घेतलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप पिल्लई यांच्यावर केला आहे.
27 ग्राहकांना एकूण 1 कोटी 56 लाख 74 हजार 539 रूपयांचा गंडा घातला आहे. सोने, डायमंड न देता घेतलेली रककम परताव्यासह परत न करता ज्वेलर्सचे दुकान बंद करून संचालक पिल्लई पसार झाला असून पोलिस त्याच्या शोधात असल्याची सूत्रांची माहीती आहे. दरम्यान यासंदर्भात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.त्या घटनांची पुर्नरावृत्ती
गुंतवणूकदारांना जादा व्याज देण्याचे प्रलोभन दाखवून भिशी योजना आणि फिक्स डिपॉङिाटच्या माध्यमातून नोव्हेंबर 2018 आणि 19 अशा सलग दोन वर्षी डोंबिवलीतील दोन ज्वेलर्स व्यापा-यांनी ग्राहकांना कोटयावधी रूपयांचा गंडा घातल्याची घटना घडली होती. याउपरही या घटना सुरू असल्याचे पुन्हा एकदा कल्याणमधील घटनेतून समोर आले आहे.