भारतीय संघाचा धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंत एका मोठा अपघातात वाचल्यानंतर पुन्हा संघात परतला आहे. अवघी भारतीय टीम जिथे नांगी टाकत असताना पंत एकटा किल्ला लढवत आहे. या पंतला या भीषण अपघातातून वाचविणारा तरुण मुलीच्या चक्करमध्ये मृत्यूच्या दारात पोहोचला आहे. यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे तर तरुण मृत्यूशी झुंज देत आहे.
पुरकाजी पोलीस ठाणे क्षेत्रातील बुच्चा वस्ती गावात हा प्रकार घडला आहे. पंतचा जीव रजतने वाचविला होता. त्याचे २१ वर्षींय तरुणी मनु कश्यप हिच्यावर प्रेम होते. दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी या दोघांच्या लग्नास नकार दिला. तसेच त्यांचे लग्नही दुसरीकडे ठरवून टाकले. प्रेमात अपयश आल्याने तीन दिवसांपूर्वी त्यांनी विष प्राशन केले होते. यात प्रेयसी मनूचा मृत्यू झाला तर रजत हॉस्पिटलमध्ये आहे. ९ फेब्रुवारीच्या रात्री या दोघांनी विष प्राशन करून प्रेम संपविण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणात रजतवर मनूच्या आईने गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलीला रजत जबरदस्तीने घरातून घेऊन गेला व तिला विष पाजल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुरकाजी पोलीस याचा तपास करत आहेत. रजतला शुद्ध आल्यावर त्याचा जबाब नोंदविला जाणार आहे.
ऋषभ पंतने या रजतला आपला जीव वाचविल्यामुळे स्कुटर भेट दिली होती. ऋषभ दिल्लीवरून घरी परतत असताना त्याचा मध्यरात्रीच्या सुमारास मोठा अपघात झाला होता. त्याची कार जळाली होती. यावेळी दोन तरुणांनी ऋषभला कार बाहेर काढले होते. त्याच्या पायाला आणि डोक्याला मार लागला होता. जर या दोघांनी त्याला बाहेर काढले नसते तर ऋषभचा कारसोबत जळून मृत्यू झाला असता. त्याला वाचविणाऱ्या या दोघांपैकी एक तरुण रजत आहे.