Jos Buttler was reunited with his family : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर हा इंडियन प्रीमिअर लीग २०२२त प्रतिस्पर्धी गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई करतोय. पण, हाच बिनधास्त बटलर जेव्हा त्याच्या नन्ही परीला भेटतो, तेव्हा तो प्रचंड भावनिक झालेला पाहायला मिळाला. आयपीएल २०२२त खेळणाऱ्या बटलरची जवळपास महिन्याभरानंतर कुटुंबीयांशी भेट झाली आणि त्याने त्याच्या मुलीला मारलेली घट्ट मिठी ही सोशल मीडियावर हिट ठरली. कुटुंबीयांना भेटून बटलर भावनिक झालेला दिसला.
आयपीएलमध्ये खेळताना खेळाडूंना दोन महिने कुटुंबापासून दूर रहावं लागतं. त्यात कोरोनामुळे खेळाडूंना बायो बबलमध्ये रहावं लागतंय. अशात कुटुंबीयांची आठवण येणे साहजिक आहे. बटलरचे कुटूंब त्याला भेटण्यासाठी भारतात दाखल झाला. हॉटेलच्या लॉबीत जोस बटलरने त्याची मुलगी जॉर्जियाला घट्ट मिठी मारली. त्याची पत्नी ल्युसी ही पण भावुक झालेली दिसली. राजस्थान रॉयल्सने बटलर फॅमिलिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
बटलरने या पर्वात ३ शतकं झळकावली आहेत. त्याने १३ सामन्यांत ५२.२५ च्या सरासरीने ६२७ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. त्याच्यामागोमाग लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल आहे आणि त्याने १४ सामन्यांत ५३७ धावा केल्या आहेत.