Join us  

एकेकाळचा स्टार ऑलराऊंडर देतोय मृत्यूशी झुंज, यकृताचा कॅन्सर झाल्याने प्रकृती नाजूक

Heath Streak Health Update: हीथ स्ट्रीकचे नाव आजही सर्वकालीन सर्वोत्तम ऑलराऊंडर आणि एक उत्तम कोचच्या यादीत घेतलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 6:05 PM

Open in App

Cricketer Heath Streak Health Update झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीक मृत्यूशी झुंज देत आहे. ४९ वर्षीय स्ट्रीकला यकृतामध्ये लेव्हल-४ कर्करोग आहे. त्यांची प्रकृती अत्यंत वाईट असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. 1993 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणारा हिथ स्ट्रीक त्याच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. नंतर तो इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गुजरात लायन्स सारख्या संघांच्या कोचिंग स्टाफचा एक महत्त्वाचा भाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश आणि झिम्बाब्वेचे प्रशिक्षकपदही त्याने भूषवले.

झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्र्यांनी ट्विट केले, 'हीथ स्ट्रीक शेवटच्या टप्प्यावर आहे. हे कुटुंब यूकेमधून दक्षिण आफ्रिकेत जात आहे. असे दिसते की आता केवळ चमत्कारच त्यांना वाचवू शकेल. त्याला प्रार्थनेची गरज आहे.' यानंतर कुटुंबाच्या वतीने एक निवेदनही जारी करण्यात आले, 'हीथला कॅन्सर आहे आणि दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रतिष्ठित कर्करोगतज्ज्ञांद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तो क्रिकेटच्या मैदानात ज्याप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाचा सामना करायचा तसाच तो आता कर्करोगाचा सामना करत आहे. आम्हाला आशा आहे की ही एक खाजगी कौटुंबिक बाब राहील. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. त्यांच्या प्रकृतीबाबत सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य केले जाणार नाही. कृपया अफवांकडे लक्ष देऊ नका.'

2005 मध्ये खेळला गेलेला शेवटचा सामना- झिम्बाब्वे क्रिकेटच्या सुवर्णकाळात, स्ट्रीक केवळ संघाचा महत्त्वाचा भागच नव्हता तर त्याच्या नेतृत्वाखाली अनेक संस्मरणीय सामने संघाने जिंकले. वेगवान गोलंदाजी करण्याबरोबरच खालच्या क्रमावर येऊन वेगवान धावा करण्यातही तो निष्णात होता. हिथ स्ट्रीकने 1993 ते 2005 दरम्यान एकूण 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले. उजव्या हाताच्या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये 1990 धावा केल्या आणि 216 विकेट्स घेतल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये स्ट्रीकने 2943 धावा केल्या आणि 239 फलंदाजांना बाद केले. त्याने 21 कसोटी आणि 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. 2021 मध्ये, त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आयसीसीने आठ वर्षांची बंदी घातली होती.

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सझिम्बाब्वेकर्करोग
Open in App