Jay Shah vs PCB : जय शाह यांचं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झोंबलं; लांबलचक पत्र काढून दिला धमकी वजा इशारा

PCB vs Jay Shah - भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील  २३ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 02:52 PM2022-10-19T14:52:49+5:302022-10-19T14:53:14+5:30

whatsapp join usJoin us
The Pakistan Cricket Board has issued the statement following the Asian Cricket Council President Jay Shah’s remarks on  shifting of next year’s Asia Cup to a neutral venue | Jay Shah vs PCB : जय शाह यांचं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झोंबलं; लांबलचक पत्र काढून दिला धमकी वजा इशारा

Jay Shah vs PCB : जय शाह यांचं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झोंबलं; लांबलचक पत्र काढून दिला धमकी वजा इशारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PCB vs Jay Shah - भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील  २३ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) लांबलचक पत्र काढून टीका केली आहे.

Shahid Afridi ने जय शाह यांची अक्कल काढली; सईद अन्वरने केली भारतातून वर्ल्ड कप हलवण्याची भाषा


“पुढील वर्षी होणारी आशिया चषक तटस्थ ठिकाणी हलवण्यासंदर्भात आशियाई क्रिकेट परिषदेचे ( एसीसी) अध्यक्ष जय शाह यांनी काल केलेल्या विधानाबाबत पीसीबीने आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे. आशियाई क्रिकेट परिषद किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( यजमान) यांच्याशी चर्चा किंवा सल्लामसलत न करता आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम यांचा कोणताही विचार न करता हे विधान केले गेले आहे,''असे पीसीबीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

"पाकिस्तानला एसीसी बोर्ड सदस्यांचा जबरदस्त पाठिंबा आणि प्रतिसाद मिळाल्याने आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद दिले गेले. शाह यांचे आशिया चषक स्थलांतरित करण्याचे विधान स्पष्टपणे एकतर्फी आहे. हे तत्त्वज्ञान आणि भावनेच्या विरुद्ध आहे.  एक संयुक्त आशियाई क्रिकेट मंडळ तिच्या सदस्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि आशियातील क्रिकेट खेळाचे आयोजन, विकास आणि प्रचार करण्यासाठी सप्टेंबर १९८३ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना करण्यात आली होती.''

“अशा विधानांच्या एकूण प्रभावामुळे आशियाई आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायांमध्ये फूट पडण्याची क्षमता आहे. ICC क्रिकेट विश्वचषक २०२३ आणि २०२४-२०३१ या कालावधीत भारतात होणाऱ्या ICC स्पर्धांवरही याचा परिणाम होऊ शकतो. पीसीबीला आतापर्यंत एसीसीच्या अध्यक्षांकडून कोणतेही अधिकृत पत्र किंवा स्पष्टीकरण मिळालेले नाही. त्यामुळे, PCB ने आता आशियाई क्रिकेट परिषदेला विनंती केली आहे की या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या शक्य तितक्या लवकर आपल्या बोर्डाची तातडीची बैठक बोलावली.''

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: The Pakistan Cricket Board has issued the statement following the Asian Cricket Council President Jay Shah’s remarks on  shifting of next year’s Asia Cup to a neutral venue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.