नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने ( Sandeep Lamichhane ) याला पाटण उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. एका अल्पवयीन मुलीने स्टार क्रिकेटवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता आणि या लेग-स्पिनरला काठमांडू जिल्हा न्यायालयाने ८ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पाटण उच्च न्यायालयाने बुधवारी संदीप लामिछाने याला 'निर्दोष' ठरवले. आता, तो आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघ निवडीसाठी उपलब्ध आहे.
नेपाळ क्रिकेट संघासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर ही खूप मोठी घटना आहे. कारण, संदीप हा त्यांचा स्टार फिरकीपटू आहे. नेपाळने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला असता तरी आयसीसीच्या नियमानुसार २५ मे पर्यंत संघात बदल करू शकतात. संदीपने नेपाळकडून ५१ वन डे व ५२ ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे ११२ व ९८ विकेट्स घेतल्या आहेत. रोहित पौडेल याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे. ४ जूनला नेपाळचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध टेक्सास येथे होणार आहे. त्यानंतर श्रीलंका ( १२ जून), दक्षिण आफ्रिका ( १५ जून ) व बांगलादेश ( १७ जून) यांच्याशी त्यांचा सामना आहे.
नेपाळ संघ : रोहित पौडेल (क), आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल भुर्तेल, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल, कमल सिंग आयरी
Web Title: The Patan High Court has overturned the ruling of the Kathmandu District Court and declared Sandeep Lamichhane innocent, likely to included in Nepal's T20 World Cup squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.