भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी रणजी करंडक स्पर्धेवरून ( Ranji Trophy 2022) बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडक स्पर्धेच्या आयोजनावर संभ्रमाचे वातावरण आहे. देशातील सर्वत जूनी स्थानिक क्रिकेट स्पर्धा कशी व केव्हा खेळवायची याबाबतचा निर्णय अजूनही बीसीसीआयनं घेतलेला नाही. त्यावरून शास्त्रींनी बीसीसीआयचे कान टोचले आहे. ते म्हणाले,''रणजी करंडक स्पर्धा ही भारतीय क्रिकेटचा पाठीचा कणा आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे दुलर्क्ष करण्यास सुरुवात कराल, तेव्हा आपलं क्रिकेट कणाहीन होण्यास सुरुवात होईल.'
कोरोनामुळे २०२०-२१ची रणजी करंडक स्पर्धा झालेली नाही. यावर्षी जानेवारीत ही स्पर्धा होणे अपेक्षित होते, परंतु ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा स्थगित करावी लागली. आता बीसीसीआय रणजी करंडक दोन टप्प्यात खेळवण्याचा विचार करत आहे. आयपीएल पूर्वी व आयपीएल नंतर असे ते दोन टप्पे असतील.
Virat Kohli आणखी 2 वर्ष कसोटी कर्णधारपदावर राहिला असता, परंतु अनेकांना त्याचे यश पचले नसते
ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर विराट कोहलीकडून BCCIनं वन डे संघाचेही कर्णधारपद काढून घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पराभवामुळे विराटनं कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले. शिवाय भारतानं कसोटीत अव्वल स्थानापर्यंत झेप घेतली. हा निर्णय घेण्यापूर्वी विराट व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातल्या वादाच्या चर्चाही रंगल्या. पण, शास्त्री यांनी विराटनं या सर्वाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करावे असा सल्ला दिला.
India Todayला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले,''विराट कोहलीनं कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहायला हवे होते की नाही, तर हो. त्यानं आणखी दोन वर्ष तरी कसोटी संघाचे नेतृत्व संभाळले असते. पुढील दोन वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि त्यांचा मुकाबला कसोटी क्रमवारीत 9-10 क्रमांकावर असलेल्या संघांसोबत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून त्याच्या नावावर 50-60 विजय नक्की नोंदवले गेले असते, परंतु हे अनेक लोकांना पचनी पडले नसते. त्यांची पोट दुखी सुरू झाली असती.''
ते पुढे म्हणाले,''दोन वर्ष त्यानं सक्षमपणे हे नेतृत्व पार पाडले असते, परंतु त्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा. दुसऱ्या देशात हे विक्रम अविश्वसनीय ठरले असते. तुम्ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्याविरुद्ध जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेतील पराभव, परंतु त्यानं कर्णधारपदावर रहावं की नाही, ही चर्चा सुरु राहिली असती.''
Web Title: The Ranji Trophy is the backbone of Indian cricket, The moment you start ignoring it our cricket will be SPINELESS, Say Ravi Shastri
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.