शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये भारतानेपाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. एकदिवसीय विश्वचषकातील विकेट्सच्या बाबतीत भारताचापाकिस्तानविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध विक्रमी विजय मिळवला, तर एक विक्रमही प्रेक्षकांच्या नावावर झाला. हा रेकॉर्ड दर्शकांच्या संख्येबद्दल आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक व्ह्यूज मिळाले, यामुळे लाइव्ह स्ट्रीमिंग व्ह्यूअरशिपचा विक्रम झाला. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ३.५ कोटी प्रेक्षकांनी डिस्ने हॉटस्टारवर पाहिला. क्रिकेट सामन्याच्या लाइव्ह स्ट्रीमिंगची मागील विक्रमी संख्या ३.२ कोटी होती, जी इंडियन प्रीमियर लीगच्या १६ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान नोंदवली होती.
भारताने फलंदाजी सुरू केली तेव्हा Disney + Hotstar वरील भारत आणि पाकिस्तान विश्वचषक सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहणाऱ्यांची संख्या ३ कोटींच्या पुढे गेली. पाकिस्तानने १९२ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर अनेक भारतीय चाहते संघाची फलंदाजी पाहण्यासाठी लाईव्ह होते.सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी सुरू होती तेव्हाही प्रेक्षक संख्या २ कोटी होती.
नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २८ मिलियन दर्शकांनी Disney+Hotstar वर थेट पाहिला होता, सध्या चालू असलेल्या ICC क्रिकेट विश्वचषकाचा अधिकृत स्ट्रीमिंग भागीदार आहे. यापूर्वी, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ICC टूर्नामेंट सामन्यासाठी दर्शकांची विक्रमी संख्या २.५३ कोटी होती. २०१८ च्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान हा विक्रम केला.