जेम्स अँडरसननं रचला इतिहास, क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रचला गेला हा विक्रम 

James Anderson World Records: इंग्लंडच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या जेम्स अँडरसनने अजून एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६५० बळींचा टप्पा पार करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:53 PM2022-06-14T12:53:50+5:302022-06-14T16:05:21+5:30

whatsapp join usJoin us
The record was set by James Anderson for the first time in the 145-year history of cricket | जेम्स अँडरसननं रचला इतिहास, क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रचला गेला हा विक्रम 

जेम्स अँडरसननं रचला इतिहास, क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रचला गेला हा विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - इंग्लंडच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या जेम्स अँडरसनने अजून एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. जेस्म अँडरसननं जो विक्रम केला आहे तो कसोटी क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात कुठल्याही अन्य वेगवान गोलंदाजाला करता आलेला नाही. जेस्म अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६५० बळींचा टप्पा पार करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो मुरलीधरन आण शेन वॉर्ननंतर तिसऱ्या स्थानी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला कसोटी सामना हा इंग्लं आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १८७७ मध्ये पहिल्यांदा खेळवला गेला होता. तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही वेगवान गोलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करता आली नव्हती. दरम्यान, २००३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जेम्स अँडरसनने १९ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर कसोटी क्रिकेटमधील ६५० बळींचा टप्पा ओलांडला आहे.

३९ वर्षीय जेम्स अँडरसनने न्यूझीलंडविरुद्ध नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या डावात टॉम लॅथमला ४ धावांवर त्रिफळाचित करत कसोटी क्रिकेटमधील त्याच्या ३५० बळींचा टप्पा पूर्ण केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये ६५० बळींचा टप्पा ओलांडणारा अँडरसन हा एकमेव वेगवान गोलंदाज आहेत.

कसोटी क्रिकेटमधील सर्वांधिक बळींचा विचार केल्यास सर्वाधिक ८०० बळींचा विश्वविक्रम श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर आहे. मुरलीधरन नंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ७०९ बळी मिळवले होते. तर ६५० बळींसह अँडरसन तिसऱ्या स्थानी आहे. तर भारताचा अव्वल फिरकीपटू अनिल कुंबळे ६१९ बळींसह सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.  

Web Title: The record was set by James Anderson for the first time in the 145-year history of cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.