Join us  

India vs Pakistan सामन्याची तारीख बदलली, आता करा तिकीट बुकींगसाठी घाई; झटपट वाचा नियम 

आसीसीने तिकीटांबाबतही महत्त्वाची माहिती दिली. वर्ल्ड कप स्पर्धेची तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्यांना १५ ऑगस्टपूर्वी आयसीसीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 6:32 PM

Open in App

The schedule of ODI World Cup 2023 tickets: आयसीसीने बुधवारी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. सुरक्षेच्या कारणास्तव काही सामन्यांच्या तारखा बदलण्याचा प्रस्ताव बीसीसीआयकडे आला होता आणि त्यानुसार आज त्यावर अंतिम निर्णय झाला. IND vs PAK यांच्यासह एकूण ९ सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केल्याचे आयसीसीने जाहीर केले. भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना १५ ऑक्टोबरऐवजी १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यांची सुरुवातीला जेव्हा तारीख जाहीर झाली, तेव्हा अहमदाबाद येथील हॉटेल्स झटपट बुक्स झाले. हॉटेल्स रुमचे दरही ५० हजाराच्या घरात गेले, विमानांची तिकीटही महागली. पण, आयसीसीने वर्ल्ड कप स्पर्धेच्या तिकीटांबाबत काहीच जाहीर न केल्याने संभ्रम होता.

 ODI World Cup 2023 स्पर्धेतील भारताच्या वेळापत्रकातही झाला बदल, दोन सामन्यांच्या तारखा बदलल्या 

पण, आज आसीसीने तिकीटांबाबतही महत्त्वाची माहिती दिली. वर्ल्ड कप स्पर्धेची तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्यांना १५ ऑगस्टपूर्वी आयसीसीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. तिकीट खरेदीसाठी आयसीसीने ७ वेगवेगळ्या तारखा ठरवल्या आहेत आणि भारत वगळता अन्य संघांच्या तिकीटांची खरेदी २५ ऑगस्टपासून करता येणार आहे. भारत-पाकिस्तान लढतीसाठी ३ सप्टेंबरला बुकींग करावी लागणार आहे, तर उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे तिकीट १५ सप्टेंबरला उपलब्ध होणार आहेत.

भारताच्या सामन्यांच्या तिकीट खरेदीचे वेळापत्रकवि. ऑस्ट्रेलिया - ३१ ऑगस्टवि. अफगाणिस्तान - ३१ ऑगस्टवि. बांगलादेश - ३१ ऑगस्टवि. इंग्लंड - १ सप्टेंबर वि. न्यूझीलंड - १ सप्टेंबरवि. श्रीलंका - १ सप्टेंबर वि. पाकिस्तान - ३ सप्टेंबरवि. दक्षिण आफ्रिका - २ सप्टेंबरवि. नेदरलँड्स - २ सप्टेंबर  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसीबीसीसीआय
Open in App