भारतीय क्रिकेट संघ आता 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. यानंतर टीम इंडिया 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला जाईल. गेल्या वर्षी भारतीय संघ साखळी सामन्यांच्या फेरीतच अगदी लाजिरवाण्या पद्धतीने बाहेर पडला होता. मात्र, यावर्षी रोहित शर्मा टीम इंडियाला वर्ल्ड कप मिळवून देण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरेल. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिलेक्टर्सने अत्यंत स्फोटक माणल्या जाणाऱ्या फलंदाजाला टीम इंडियात संधी दिली आहे.
टीम इंडियाला मिळाला युवराजसारखा फलंदाज? -
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी, आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या काही खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याच खेळाडूंमध्ये एक खेळाडू असाही आहे, जो आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची नाव तिराला लावू शकेल. ज्या खेळाडूसंदर्भात आपण बोलत आहोत त्याचे नाव आहे दीपक हुड्डा (Deepak Hooda). गेल्या काही दिवसांपासून हुड्डाने जबरदस्त कामगिरी केली आहे.
मिडिल ऑर्डरसाठी होती चांगल्या फलंदाजाची गरज -
खरे तर, दिग्गज फलंदाज युवराज सिंगने निवृत्ती घेतल्यापासूनच, भारतीय संघाला मिडल ऑर्डरसाठी, त्याच्या सारख्याच एखाद्या फलंदाजाची गरज होती. दीपक हुड्डा हा वेगवान फलंदाजी करण्याबरोबरच विकेट्स वाचविण्यातही पटाईत आहे, असे आयपीएलमध्ये दिसून आले आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने 15 सामन्यांत 136 पक्षाही अधिकच्या सरासरीने 451 धावा केल्या आहेत.
आयपीएलमधील या कामगिरीच्या जोरावरच हुड्डाला टीम इंडियामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तो 3, 4 आणि 5 व्या क्रमांकावरही चांगली फलंदाजी करू शकतो.
Web Title: The selectors finally got a batsman like Yuvraj singh deepak hooda Will win the T20 World Cup on his own
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.