Join us  

थलैवाच्या भेटीनं भारावला इरफान; सांगितला रजनीकांतचा साधेपणा

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानाल धूळ चारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 2:52 PM

Open in App

दाक्षिणात्य चित्रपटांचा बादशहा आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या साधेपणाचा अनकेदा अनुभव येतो. थलैवा रनजीकांतला चाहते अक्षरश: देव मानतात. रजनी जेवढं त्याच्या चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकतो, तेवढच त्यांच्या साधेपणातूनही तो सर्वांचा आवडता बनला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा जेलर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा त्याने बंगळुरूतील बस डेपोला भेट दिली होती, जिथं त्याने कंडक्टर म्हणून नोकरी केली होती. रजनीच्या साधेपणाचे अनेक किस्से आहेत. आता, टीम इंडियाचा माजी गोलंदाज इरफान पठाणनेरजनीकांतचचा साधेपणा सांगितला आहे. 

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानाल धूळ चारली. अफगानच्या विजयानंतर इरफान पठाणने अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खानसोबत भांगडा खेळून त्याचं अभिनंदन केलं. तसेच, अफगाणिस्तानच्या विजयाचंही सेलिब्रेशन केलं. त्यानंतर, इरफानने सुपरस्टार रजनीकांतसोबतचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. या फोटोसोबतच त्याने रजनीकांतचा साधेपणाही व्यक्त केला. 

आपल्या देशातील सर्वात मोठा सुपरस्टार. परंतु, या ग्रहावरील सर्वात साधी व्यक्ती म्हणजे थलैवा रजनीकांत. त्यांना भेटून खूप छान शिकायला मिळाले, असे इरफानने म्हटले आहे. या फोटोत रजनीकांत अतिशय साध्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. टी-शर्ट, साधी ट्राऊजर आणि हातात बॅग घेऊन रजनीकांत उभे आहेत. तर, इरफान पठाणच्या चेहऱ्यावर थलैवाच्या भेटीचा आनंद झळकत आहे. दरम्यान, इरफानच्या या फोटोवर नेटीझन्सनेही कमेंट करुन दाद दिली आहे. काहींनी दोन सुपरस्टार असेही म्हटले. दरम्यान, यापूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही रजनीकांत यांची भेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला होता. धोनी द अनटोल्ट स्टोरी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी धोनीने रजनीकांतची भेट घेतली होती.  

टॅग्स :रजनीकांतइरफान पठाणभारतीय क्रिकेट संघ