Join us  

राचिन रवींद्र नावामागे मजेशीर स्टोरी! वडिलांच्या क्रिकेट प्रेमातून झालं अजब नामकरण

पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात विक्रमी कामगिरी करणाऱ्या राचिन रवींद्रला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 9:28 PM

Open in App

ICC ODI World Cup England vs New Zealand Live : डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway ) आणि राचिन रवींद्र ( Rachin Ravindra ) यांनी न्यूझीलंडलावन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवून दिला. इंग्लंडने २८३ धावांचे लक्ष्य या दोघांनी ३६.२ षटकांत पार केले. राचिनने ९६ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १२३ धावा केल्या, तर कॉवनेने १२१ चेंडूंत १९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १५२ धावा केल्या. राचिन रवींद्रला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. 

राचिन रवींद्रने आज ८२ चेंडूंत शतक झळकावले आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडकडून नोंदवलेले हे वेगवान शतक ठरले. याच सामन्यात डेव्हॉन कॉनवेने ८३ चेंडूंत शतक झळकावून मार्टीन गुप्तील ( ८८ चेंडू वि. बांगलादेश, २०१५) याचा विक्रम मोडला होता. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून शतक झळकावणारा राचिन रवींद्र ( २३ वर्ष व ३२१ दिवस) हा युवा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम १९९६ मध्ये नॅथन अॅस्टलने ( २४ वर्ष व १५२ दिवस वि. इंग्लंड) आणि ख्रिस हॅरिसने ( २६ वर्ष व ११२ दिवस वि. ऑस्ट्रेलिया) यांच्या नावावर होता.  

राचिनचे वडिल रवी कृष्णमूर्ती हे मुळचे बंगळुरुचे, तर त्याच्या आईचे नाव दीपा कृष्णमूर्ती. बऱ्याच वर्षांपासून ते न्यूझीलंडमध्येच आहेत. राचिनचा जन्मही न्यूझीलंडमधील वेलिंग्टनचा आहे. रवि कृष्णमूर्ती हे बंगळुरू येथील सॉफ्टवेअर सिस्टम आर्किटेक्ट होते. न्यूझीलंडमधील हट हॉक्स क्लबचे संस्थापक रवींद्र यांचे वडील रवी कृष्णमूर्ती १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतातून स्थलांतरित झाले आणि न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले.  

कृष्णमूर्ती त्यांच्या कामानिमित्त ९० च्या दशकात न्यूझीलंडला गेले होते. राचिनच्या वडिलांना क्रिकेटमध्ये खूप रस होता आणि त्यांनी वेलिंग्टनमध्ये स्वतःचा क्रिकेट क्लबही सुरू केला होता. सचिन तेंडुलकर   आणि राहुल द्रविडचे  चाहते असलेल्या राचिनच्या वडिलांनी या भारतीय दिग्गजांच्या नावांची अक्षरे मिसळून आपल्या मुलाचे नाव 'राचिन' ठेवले.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपन्यूझीलंडसचिन तेंडुलकरराहुल द्रविडइंग्लंड